Sachin Vaze | सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा, आरोपपत्रात खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ईडीने (ED) नुकतीच दोन आरोपपत्र (Chargesheet) विशेष न्यायालयात (special court) दाखल केली आहेत. ही दोन्ही आरोपपत्र अनिल देशमुख यांचे खाजगी आणि शासकीय पीए संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांच्या विरोधात दाखल केलेली आहेत. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना सचिन वाझे (Sachin Vaze) याला 16 पैशांनी भरलेले या बॅगा द्यायला सांगितले होते आणि हे पैसे सचिव वाझे (Sachin Vaze) याने कुंदन शिंदे याला दोन वेळा दिले होते, असा धक्कादायक खुलासा या आरोपपत्रातून केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा सह्याद्री गेस्ट हाऊस (Sahyadri Guest House) बाहेर आणि दुसऱ्यांदा राजभवनाजवळ 4 कोटी 60 लाख रुपये देण्यात आले होते.
असा आरोप करण्यात आला आहे.
तर जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 म्हणजेच याच वर्षी सचिन वाझे याने
अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन ऑर्केस्ट्रा बार मालकाकडून जवळपास 1 कोटी 64 लाख रुपये वसूल केले होते.
मुंबई पोलिसांच्या झोन 1 आणि झोन 7 या दोन झोनमधून हे पैसे गोळा केले होते.
म्हणजेच साऊथ मुंबई आणि मुंबई उपनगर या भागातून हे पैसे गोळा केले होते.

तर सचिन वाझे याने सीआययु (CIU) म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिट (Crime Intelligence Unit)
या युनिटचा पदभार स्वीकारल्यानंतर ऑर्केस्ट्रा आणि बार ओनर्सना त्यांचे बार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी 4 कोटी 70 लाख रुपये मागितले होते आणि ते त्याने गोळा करुन दिले होते.
हे सर्व पैसे सचिन वाझे याने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांच्या मार्फत किंवा याच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवले होते.

 

रिलायबल फायनान्स कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, व्ही ए रियल कोन प्रायव्हेट लिमिटेड, उत्सव सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि शिताल लिजिंग अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवले होते.
नंतर हीच रक्कम विविध बँकांतून श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट (Sri Sai Shikshan Sanstha Trust)
या संस्थेच्या खात्यात वळते करण्यात आले होते.
एवढेच नाही तर 2013 पासून श्री साई शिक्षण संस्था ट्रस्टमध्ये अनेक बेनामी व्यवहार ईडीला आढळले आहेत.

ईडीने असा दावा केला आहे की, श्री साई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि देशमुख आणि त्याच्या परिवारातील सदस्य हे काळा पैसा पांढरा करत होते.
या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्टचे सर्व आर्थिक व्यवहार ईडी तपासत असून प्रथमदर्शनी या
साई शिक्षण संस्था प्रश्न आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार आढळून आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title : Sachin Vaze | sachin vaze had handed over 16 bags to anil deshmukhs secretary in ed chargesheet revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Modi’s Birthday | ‘PM मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा नवा विक्रम; 2 कोटींचा आकडा गाठला

PMC 7th pay Commission | 7 व्या वेतन आयोगावरून सर्वसाधारण सभेत ‘नरम नोकझोंक’

KCC | खुशखबर ! मोदी सरकार सर्व शेतकर्‍यांना देणार ‘किसान क्रेडिट कार्ड’, ‘इथं’ करा अर्ज आणि घ्या ‘लाभ’, जाणून घ्या प्रोसेस