Sachin Vaze | चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा अजब दावा, म्हणाला – ‘मी अनिल देशमुखांना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sachin Vaze | बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची सध्या चौकशी सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) सचिन वाझे यांची उलटतपासणी घेण्यात आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी (Lawyer Anita Castellino) उलटतपासणी घेतली आहे. यावेळी वाझेने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. ‘अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाहीये.’ असं सचिन वाझेने म्हटलं आहे.

 

आज (बुधवारी) चांदिवााल न्यायालयीन चौकशी आयोगाची (Chandiwal Judicial Inquiry Commission) सुनावणी घेण्यात आली. त्यादरम्यान, वकील अनिता कॅस्टेलिनो (Lawyer Anita Castellino) यांनी सचिन वाझेला (Sachin Vaze) काही प्रश्न केले. त्यावेळी लगेच देशमुख यांच्या दुसऱ्या एका वकिलाने मध्यस्थी करत परमबीर आणि वाझे (Parambir and Waze) यांची कथित भेटीवरुन प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वृत्तांकनावर नाराजी व्यक्त केलीय. वृत्तांकनावरुन परमबीर (Parambir Singh) यांना त्रास होतोय असं आयोगापुढं म्हटलं. त्यावेळी प्रसारमाध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि जे घडलं ते त्यांनी लिहिलं असं वाझे याने उत्तर दिलं आहे.

ही खुली चौकशी आहे यामध्ये सर्वांना काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. जे घडलं ते सांगितलं गेलं ते लिहिलं गेलं असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिल शिशिर हिरे (Lawyer Shishir Hire) यांनी केला आहे. त्यावेळी देशमुख यांच्या वकिलांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आणि पुन्हा सचिन वाझेच्या उलटतपासणीला सुरुवात केलीय. दरम्यान, वाझे याची उलट तपासणी झाल्यानंतर आजचे न्यायालयीन चौकशी आयोगाचे कामकाज थांबवलं. तसेच, वाझेला त्याच्या वकीलांना भेटण्यासाठी आणि देशमुख यांना त्यांच्या वकिलांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आलीय. तर, याबाबत पुढील सुनावणी 13 डिसेंबरला घेण्यात येणार आहे.

 

Web Title :- Sachin Vaze | sachin vaze said i do not remember when i meet former home minister anil deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mahek Chahal-Riddhima Pandit | अखेर ‘नागिन 6’मध्ये महक चहल आणि रिध्दिमाची एन्ट्री; नागिन बनून करणार शत्रुंचा ‘नाश’

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या ‘मुन्नी’नं शेअर केला व्हिडिओ, करिना कपूरच्या अंदाजामध्ये म्हणाली…

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! स्वच्छतागृहात जायच्या आधी महिलांना लिहावा लागायचा अर्ज; ‘या’ कंपनीतील प्रकाराचा ‘मनसे’कडून ‘पर्दाफाश’