Sachin Waze | सचिन वाझेची उलटतपासणी; अनिल देशमुखांबद्दल वाझे जबाबात म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sachin Waze | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे सचिव संजीव पंलाडे (Sanjeev Palande) यांच्या वकीलाकडून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याची उलटतपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सचिन वाझेने अनिल देशमुखांच्या सांगण्यावरूनच पोलीस खात्यात पुन्हा येण्यासाठी वाझेने अर्ज केल्याचं म्हटलं आहे, मात्र पुरावे नसल्याचं देखील सचिन वाझेने जबाबात म्हटलं आहे.

सचिन वाझेनं (Sachin Waze) आपल्या जबाबात म्हटलं आहे की, अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सांगण्यावरून आल्याचा कुठलाही पुरावा नसला तरी माझ्याकडे रिक्वेस्ट लेटर असल्याचं जबाबात म्हटलं आहे. सचिन वाझेने चांदीवाल आयोगाच्या चौकशीत ही माहिती उलटतपासा दरम्यान दिली आहे.

दरम्यान, मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) अटक झाली आहे.
तर माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत, त्यानंतर परमबीर यांना फरार घोषित करण्यात आलं. याच प्रकरणावरून भाजपकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. वाझे सरकारमधील मंत्र्यांचा वसूली एजंट असल्याचे आरोप झाले. त्यानंतर याप्रकरणात सीबीआय आणि ED चीही एन्ट्री झाल्याचं पहायला मिळालं. ED आणि CBI कडून देशमुखांच्या घरावर छापेमारी करण्यात आली.

 

Web Title :- Sachin Waze | sachin vaze on former home minister anil deshmukh and back into police force

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Parambir Singh | फरार मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच, ‘या’ ठिकाणी आहेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त

Maharashtra Cabinet Reshuffle | अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसचे दोन मंत्री बदलणार तर, ‘या’ चेहर्‍यांना संधी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी