संजय राऊतांना पदावरून हाकला, संभाजी भिडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खाजदार संजय राऊत हे सध्या आपल्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र आता विरोधकांसोबत अनेकांनी राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे उर्फ भिडे गुरूजी यांनी केली आहे.

राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यानंतर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे. भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेनं या बंदची हाक दिली आहे. संभाजी भिडे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बंद नंतर पत्रकारांशी संवाद साधताना भिडे बोलत होते.

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे –
– आमचा बंद कोणत्याही पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या विरोधात नाही.
– राऊत यांना कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही.
– संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे.
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही.
– वंशजांना राष्ट्रपतींच्या इतकाच मान मिळाला पाहिजे.
– राऊत यांनी बोलताना तारतम्य बाळगणं गरजेचं आहे.

शिवसेनेचा या बंदला विरोध आहे असे समजताच भिडे भडकले आणि शिवसेना विरोध करणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना पदावरून काढावे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी यावेळी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like