Video : ‘सेक्रेड गेम्स २’ चा ट्रेलर ‘OUT’ ; ‘सर्वसक्‍तीसाली’ गणेश गायतोंडे ‘या’ दिवशी परतणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स ही वेब सीरीज प्रेक्षकांमध्ये खूप गाजली. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरीजच्या दुसऱ्या सीजनची चाहते वाट पहात होते. यातील गणेश गायतोंडेचं पात्र सर्वांनाच आवडलं होतं. कभी कभी लगता है अपुन ही भगवान है हा सर्वसक्तीसाली गणेश गायतोंडेचा डायलॉगही खूप गाजला होता. सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, सेक्रेड गेम्सचा दुसरा सीजन १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याबाबत सोशल मीडियावरून अधिकृत घोषणाही झाली आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा ट्रेलर व्हायरल होताना दिसत आहे. या सिजनमध्ये काय पाहायला मिळणार आहे याची झलक हा ट्रेलर सांगतो. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, जंग का वक्त आ गया है असं म्हणत गणेश गायतोंडे सरताज सिंगला पुन्हा एकदा आव्हान देतो. या ट्रेलरमध्ये कलकी आणि रणवीर शौरी हे दोन नवीन चेहरेही पाहायला मिळतात. क्या ये दुनिया बचाने लायक है असा प्रश्न विचारणारा ट्रेलर या सीजनची उत्सुकता आणखी वाढवताना दिसतो.

गेल्या अनेक दिवसांपासून या सीरीजच्या दुसऱ्या सीजनची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पाहोचली आहे. ट्रेलरने चाहत्यांना खुशही केलं आहे आणि त्यांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे. यात असं म्हटलं गेलंय की, सब चले जाएंगे, सिर्फ त्रिवेदी बच जाएगा. त्यामुळे नेमकी कोणत्या प्रकारची जंग यावेळी दाखवली जाणार आहे असा प्रश्न निर्माण होताना दिसतो. सध्या हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे.

आरोग्यविषयक बातम्या

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई