‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होताच ‘हा’ व्यक्ती झाला ‘हैराण-परेशान’, नेटफ्लिक्सनं मागितली ‘माफी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित वेब सीरीज सेक्रेड गेम्स 2 नुकतीच रिलीज झाली आहे. या सीरीजमुळे एका व्यक्तीच्या डोक्याला चांगलाच ताप झाला आहे. कारण 15 ऑगस्टला सेक्रेड गेम्सचा दुसरा सीजन रिलीज झाला आणि एका व्यक्तीला दिवसरात्र कॉल यायला सुरुवात झाली. जगभरातून आलेल्या कॉल्समुळे या व्यक्तीला प्रचंड त्रास सहन करावा लागला.

संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या या भारतीयाचं नाव कु्न्हाब्दुल्लाह आहे. हा भारतीय म्हणतो की, “गेल्या तीन चार दिवसांपासून मला भारत, पाकिस्तान, नेपाळ अशा विविध ठिकाणांहून फोन येत आहेत. नेमकं काय झालंय तेच मला समजत नाहीये. फोनची रींग वाजली तरी मला चीड येते. मला माझा नंबर रद्द करायचा आहे.” सेक्रेड गेम्स 2 मध्ये एक मोबाईल नंबर काल्पनिक गँगस्टर सुलेमान इसा याचा आहे असं दाखवलं आहे.

37 वर्षीय कु्न्हाब्दुल्लाह एका तेल कंपनीत नोकरी करतात. सेक्रेड गेम्स काय आहे हेही त्यांना माहीत नव्हतं. याबाबत सांगताना ते म्हणतात की, “सेक्रेड गेम्स मी कधीच ऐकलं नाही. हा व्हिडीओ गेम आहे का ? मी सकाळी 8 ते 7 वाजेपर्यंत काम करतो. यासाठी माझ्याकडे वेळही नाही. कॉल करणारा प्रत्येकजण मला इसा म्हणून हाक मारतोय. कोण आहे इसा? मला त्याचं काही घेणंदेणं नाही.”

याबाबत वृत्त समोर आल्यानंतर नेटफ्लिक्सने कुन्हाब्दुल्लाची माफी मागितली. “तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मागतो. आम्हाला याबाबत माहिती मिळताच फोन नंबर सबटायटलमधून काढण्यात आला आहे.”अशी माहिती नेटफ्लिक्सने दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त