‘ही’ वेब सिरीज अडकणार होती वादाच्या भोवऱ्यात, अवघ्या काही तासात केली ‘ही’ सुधारणा  

मुंबई  : वृत्तसंस्था – मनोरंजन विश्वात चित्रपटांबरोबरच वेब सिरीज ने धुमाकूळ घातला आहे .सध्या नेटफ्लिक्स वरील प्रसिद्ध वेबसीरिज  सेक्रेड गेम्स चर्चेचा विषय ठरली आहे .ही वेबसिरीज चुकीच्या सब टायटल मुळे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती .जुलै महिन्यात रिलीज झालेल्या या वेबसीरिज सबटायटल देण्यात आले आहेत  या वेब सिरीजचा पहिला सीजन सबटायटल्‍सशिवाय रिलीज करण्यात आला. पण आता मात्र  या सीझनला हिंदी व इंग्रजी सबटायटल्स देण्यात आले आहेत.
या सीझनमध्‍ये अभिनेता जितेंद्र जोशीने पोलिसाची भूमिका साकारली आहे. त्‍यामध्‍ये त्‍याचा ‘मी मराठ्याची अवलाद आहे’ असा एक डायलॉग आहे. या डायलॉगचे इंग्रजी भाषांतर ‘I’m a whore’s son’ (मी वेश्येचा मुलगा) असे चुकीचे भाषांतर करण्‍यात आले होते .मात्र  या चुकीच्या भाषांतराची नेटफ्लिक्सनं तातडीनं दखल घेत आधीचं आक्षेपार्ह भाषांतर काढलं आहे व “I am Maharashtrian” अशी सुधारणा केली आहे.
या क्षेत्रातल्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार ही वेबसीरिज हिंदी असली तरी अनेक मराठी पात्र असलेल्या सेक्रेड गेम्समध्ये अनेक संवाद मराठीमध्ये आहेत. परंतु मराठीचा गंधही नसलेल्यांनी हे भाषांतर केल्यामुळे ही चूक घडली असावी अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
 सेक्रेड गेम्‍स ही वेबसीरिज याआधीही अनेक  कारणांमुळे  चर्चेत आली होती. सीरिजमध्ये असलेले भडक डायलॉग आणि दृश्‍यांवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्‍याचबरोबर, मीटू मोहिमेत फँटम फिल्मचे सहसंस्थापक व एक लेखक अशा दोघांविरोधात लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्‍यामुळे  सेक्रेड गेम्‍सचे दुसऱ्या सीझनचे प्रक्षेपण थांबवण्‍यात आले होते.