पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांच्या पत्नीचं पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांच्या पत्नीचं आज (रविवारी) दुपारी निधन झालं आहे. मोना मनोज खंडाळे असं त्याचं नाव आहे. त्या 44 वर्षाच्या होत्या.
पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे हे सध्या पुणे लोहमार्ग पोलिस दलात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पत्नीच्या अकाली निधनामुळं त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.