दुर्देवी ! भीषण अपघातात 35 वर्षीय पोलिस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन –   भरधाव कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळंब शहराजवळ घडली. आज सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे.

विवेकानंद विलास गिरी (अंदाजे वय 35 रा.केज) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद हा उस्मानाबाद पोलीस दलात कर्तव्यास होता. ते कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात त्यांची नेमणूक होती. राहण्यास केज तालुक्यात होते. केज ते कळंब असा दररोज नोकरीनिमित्त प्रवास करत. आज देखील कारने (क्र.एम.एच.44 एस 4302) प्रवास करत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघाता झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीने दोन वेळा पालटली. त्यात त्यांचा गाडीखाली येऊन जागीच मृत्यू झाला. केज ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांची पत्नी देखील पोलीस दलात आहे. त्या येथील युसूफवडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, अशी माहिती केज पोलिसांनी दिली.