हाजी फिरोज शेख यांना मातृशोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  ऑल कोंढवा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक हाजी फिरोज शेख यांच्या मातोश्री झुबेदा हसन शेख यांचे आज निधन झाले. त्यात ७२ वर्षाच्या होत्या. झुबेदा शेख या नगरसेविका परवीन हाजी फिरोज शेख यांच्या सासू होत.

पोटात दुखत असल्याने त्यांना वानवडीतील रुबी हॉलमध्ये काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची कोरोना चाचणी पॉसिटिव्ह आली.

त्यामुळे त्यांना पुणे स्टेशन येथील रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेली १० दिवस त्यांच्यावर व्हेटिंलेटरवर उपचार करण्यात येत होते.

उपचारनंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यावर त्यांना कोविड केअर सेंटरमधून आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांची नामजे जनाझा अशोका मुवज सोसायटी येथे रात्री 11 .00 वाजता पठण केली जाईल व दफन मनूशा मस्जिद नाना पेठ येथे करण्यात येईल .