संतापजनक ! कॅन्सरग्रस्त आईला बॅंक अधिकाऱ्यांसह मिळून मुलीने घातला कोट्यवधींचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बँकेतील लॉकरच्य़ा बनावट चाव्या तयार करत तसेच कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्या करून बँकेतील कोट्यवधी रुपये काढून घेत कॅन्सरग्रस्त आईची मुलीनेच बँकेच्या अधिकाऱ्यांसह मिळून फसणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी आईने न्यायालयात धाव घेतल्यावर पुरावे आणि युक्तीवाद ऐकून न्यायायलयाने मुलीसह दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहेत.

याप्रकरणी जेनोबिया रुसी पटेल (८५, कॅन्टोनमेंट) यांनी तक्रार दिली आहे. जुबिन विवियन डिसुजा उर्फ जुबिन रुसी पटेल (मुलगी), रोमिना परवेझ खंबाटा, परवेज तालिब खंबाटा, योहान खंबाटा, क्रिस्टोफर लोझोडो, जसजीत सिंह निज्जर, सतीश सबनीस यांनी बँकेतील व्यवस्थापक, अधिकारी आणि अन्य आरोपीशी संगनमत करुन जेनोबिया रुसी पटेल (८५, कॅन्टोनमेंट) यांची फसवणूक केल्याची तक्रार जेनोबिया यांनी लष्कर भागातील न्यायालयाकडे केली आहे. जेनोबिया यांचे वकील ऍड. आशुतोष श्रीवास्तव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जेनोबिया यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता. त्यांनी हडपसरमध्ये मालमत्ता खरेदी केली होती. परंतु, आजारपणामुळे ती मालमत्ता विकली. पती रुसी हयात होते तेव्हा ती रक्कम दोघांच्या संयुक्त खात्यात जमा केली. तसेच शेअर्स, म्युचूअल फंड, ठेवीं ठेवल्या होत्या, त्यानंतर जेनेबिया यांची वडीलोपार्जित मालमत्ता होती. त्यांच्या पतीचे २०१६ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मुलीने जेनोबिया यांच्या आजारपणाचा फायदा घेत ती जागा विकली, त्यानंतर जेनोबिया आणि त्यांच्या पतीच्या बनावट सह्या केल्या आणि मालमत्ता अज्ञात व्यक्तीच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांनाही मुलीबद्दल पुर्वकल्पना दिली होती. तरीही मुलीने बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून स्वतःच्या खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर याबद्दल पोलिसांत अनेकदा तक्रार करूनही कोणतीच कारवाई केली नाही. यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दोषींविरोधात अप्रामाणिकपणे आणि बनवाट कागदपत्रे तयारकरून फसवणूक करत तक्रारकर्त्यांना आर्थिक व मानसिक त्रास दिला असल्याचे ऍड. श्रीवास्तव म्हणाले.