राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा ; सदाभाऊची विखारी टीका

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा आहे. या कोल्ह्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून नव्हे तर मांडीवरच जाऊन बसला आहे, अशा शब्दात राजू शेट्टींचे एकेकाळचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी विखारी टीका केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेत इस्लामपूरात ते बोलत होते. उद्धव ठाकरे असतानाही सदाभाऊंनी राजू शेट्टीवर केलेल्या टीकेमुळे त्यांचे भाषण चांगलेच गाजले.

राजू शेट्टीवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, राजू शेट्टींना मागील वेळेस त्यांना पाठिंबा दिला होता ही माझी चूक होती. चुकीच्या माणसासाठी हातकणंगलेची जागा सोडली होती. आता ती माझी चूक तुम्ही जनतेने सुधारायची आहे, असे ठाकरे म्हणाले.

You might also like