राजु शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेला कोल्हा

इस्लामपूर (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन – हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्य़शील माने यांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेले कोल्हे आहेत, या कोल्ह्याचा या निवडणुकीत बंदोबस्त करायचा आहे. सध्या तो कारखानदारांच्या मांडीवर जाऊन बसला आहे, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.

या सभेला मंत्री चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, रामदास कदम, संपर्क प्रमुख नितिन बानुगडे पाटील, निवेदिता माने, आनंदराव पवार, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, आ. उल्हास पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुजित मिनचेकर आ. सत्यजित पाटील. आ. सुरेश हाळवणकर, राहुल महाडिक आदी यावेळी उपस्थित होते.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, म्हणणाऱ्या शेट्टींना पाच वर्षात ऊसदरासाठी आंदोलन का करावे लागले नाही ? हे आधी त्यांनी सांगावे. त्यांची दुकानदारी बंद झाल्यानेच ते कारखानदारांजवळ गेले असल्याचे, आपल्या भाषणात म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like