उस्मानाबादराजकीय

Sadabhau Khot | ‘केतकीचा मला अभिमान आहे, त्यावेळी…’ केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टचं सदाभाऊ खोत यांच्याकडून समर्थन (व्हिडीओ)

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Sadabhau Khot | अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिनं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टचा निषेध केला जात असताना दुसरीकडे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी तिला समर्थन (Support) दिलेलं आहे. रयत क्रांती संघटनेनं (Rayat Kranti Sanghatana) केतकीनं केलेल्या पोस्टचं समर्थन केलं आहेत. केतकी चितळेचा आम्हाला अभिमान आहे, असे वक्तव्य करत सभाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ते तुळजापूरमध्ये (Tuljapur) पत्रकार परिषदेत बोलत होते.

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले, केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा प्रस्थापितांविरोधात आहे, असं ते म्हणाले.

 

त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती ?

 

सरकार पुरस्कृत दहशतवाद (Terrorism) राज्यात वाढवता कशाला ? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अमृता फडणवीस (Amrita Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती ? उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल वेगळा शब्द वापरून टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती ? अमोल मिटकरी (Amol Mitkari) ब्राह्मण समाजाला (Brahmin) टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का ? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं, अशा शब्दांत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

हे धंदे आधी बंद करा

जहागीरदारांनी गुन्हा (Crime) केला तर त्याला माफ करायचं आणि इतरांनी केलं तर गुन्हा दाखल करायचा. तुरुंगात डांबायचं. तिला मानावं लागेल. तिनं कोर्टात स्वत:ची बाजू मांडली. तिच्या पोस्टनंतर तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या टीका-टिप्पणी एकदा पहा. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोलानं केला आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं असले हे धंदे आधी बंद करा, असे खोत म्हणाले.

Web Title : Sadabhau Khot | i am proud of ketki chitale support from Rayat Kranti Sanghatana sadabhau khot a new controversy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी

Back to top button