सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून शासनाच्या धोरणाचा निषेध

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – दुष्काळी परिस्थितीमध्ये टोमॅटोला किरकोळ भाव मिळत आहे याशिवाय  शासनाच्या उपाययोजना ठप्प असल्याचे दिसत आहे यामुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून याबद्दल निषेध नोंदवण्यात आला. परभणी येथील ही घटना आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एका कार्यक्रमासाठी खोत परभणीमध्ये आले होते. या कार्यक्रमानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे समजत आहे.

बुधवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमासाठी खोत बुधवारी परभणी येथे आले होते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, केशव आरमळ आदींसह इतर कार्यकर्ते उड्डाणपुलाजवळ सुरुवातीपासूनच थांबले होते.

या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला. यावेळी पोलीस बंदोबस्तही होता.  याच परिस्थितीत खोत यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेला.

You might also like