Sadabhau Khot | ‘रोहित पवार सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत;’ सदाभाऊ खोत यांची रोहित पवार यांच्यावर टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलईन – Sadabhau Khot | एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थांचे आंदोलन (MPSC Student Agitation) आज (दि.३१) पुण्यातील अलका टॉकीज चौकात सुरू होते. यावेळी विद्यार्थांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आले असता, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली. रोहित पवार हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.

 

राज्यसेवा मुख्य परिक्षेचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी अलका टॉकीज चौकात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून साष्टांग दंडवत आंदोलन (MPSC Student Agitation) करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाजपचे (BJP) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) आणि सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते.

 

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपनेते हे केवळ प्रसिध्दीसाठी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत म्हणाले, ‘या आंदोलनात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी सहभागी झाले असून, ते उद्याचे अधिकारी आहेत. या सर्व स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थी वर्गामागे हे सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या बाजूनेच निर्णय घेतील, अशी भूमिका यावेळी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्पष्ट केली.

तर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, ‘स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नक्कीच सकारात्मक निर्णय होईल. तसेच, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतील. त्याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी कुठला विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडला आणि तो मान्य होणार नाही, असे कधी होत नाही.
त्यामुळे, विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आम्ही देखील येथून उठणार नाही.’
अशी स्पष्ट भूमिका यावेळी आमदार पवार यांनी घेतली. तसेच शिंदे-फडणवीस सरकार यावर सकारात्म निर्णय घेईल.
असा विश्वास देखील यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, या आंदोलनामध्ये बोलताना, गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला.
गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘हे आंदोलन कुठल्याही पक्षाचे नसून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आहे.
विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हीच आमची भावना आहे. आम्ही एकदा कोणत्याही आंदोलनात लक्ष घातले की,
आम्ही ते पूर्ण करतो. आम्ही काही घर कोंबडे नाहीत,
असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विद्यार्थ्यांच्या मागण्या नक्कीच मान्य करतील.’
असा विश्वास देखील यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. तसेच, या विद्यार्थ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत,
तोपर्यंत आम्ही आंदोलनात सहभागी असणार. अशी स्पष्ट भूमिका यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी घेतली.

 

Web Title :- Sadabhau Khot | sadabhau khot comment on rohit pawar in student protest pune says he born with a golden spoon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Annie Wersching | हॉलीवुडच्या ‘या’ अभिनेत्रीचे कॅन्सरने निधन; वयाच्या 45 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 15 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime News | जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक