Sadabhau Khot | ‘संजय राऊत पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा म्हणतील’ – सदाभाऊ खोत

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) स्वत: आपण उमेदवार नाहीत, असे आवर्जून सांगत असताना संजय राऊत (Sanjay Raut) जुन्या कढीला नवा ऊत आणत आहेत, अशी खोचक टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राऊतांवर केली आहे. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे सोलापुर येथील शासकीय विश्रामगृहात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

संजय राऊत यांनी शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार (Presidential Candidate) व्हावेत अशी मागणी केली होती. याबद्दल तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (United States President) करा एवढेच म्हणणे राऊतांचे बाकी राहिले आहे. आपल्या गावरान ढंगात त्यांनी ‘राऊत यांना ज्यांचे त्याला कळेना’ असे म्हणत बोचरी टीका केली. याशिवाय सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर निशाणा साधला.

 

…म्हणून मी अर्ज मागे घेतला

विधानपरिषद निवडणुकीवर (Vidhan Parishad Election) भाष्य करताना सदाभाऊ खोत म्हणाले, निश्चितच आमचे पाचही उमेदवार विजयी होणार आहेत. सहाव्या उमेदवारासाठी जी काही मतांची गोळाबेरीज करावी लागते, ती होणे थोडेसे कठीण गेले असते. म्हणूनच मी माझा सहावा अर्ज मागे घेतलेला आहे. मी आता जरी दोन पावले मागे आलो असलो, तरी निश्चितच भविष्यकाळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समर्थ साथीने मी चार पावले पुढे आल्याचे दिसेल, असेही त्यांनी सांगितले.

 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणे गरजेचे

राजकारणात कोणाची कधीच निवृत्ती होत नसते. जो पर्यंत व्यक्तीमध्ये उमेद आहे, तो पर्यंत ती राजकारणात काम करत राहते.
मला माझ्या नेतृत्वावर विश्वास असल्यानेच मी ही भूमिका घेतली.
देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आम्ही विश्वासाने शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहोत. सदाभाऊ खोत आमदार (MLA) झाला काय, अन् नाही झाला काय, मात्र या राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने एक चांगला मुख्यमंत्री मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे खोत यांनी सांगितले.

 

Web Title :- Sadabhau Khot | sadabhau khot criticizes shiv sena mp sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा