Sadabhau Khot | आ. सदाभाऊ खोतांच्या मुलाचा युवा आघाडी अध्यक्षाच्या घरात सशस्त्र ‘राडा’, 4 जणांवर FIR

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatana) संस्थापक आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर टीका करण्यात आली होती. या रागातून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा मुलगा सागर खोत (Sagar Khot) याने आपल्या साथीदारांसह वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने (Ravi Kiran Mane) यांच्या घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण (beaten) केली. माने यांना शिवीगाळ करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (6) रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.

रविकिरण राजाराम माने (वय-35) यांनी याबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात (Kasegaon Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सागर सदाभाऊ खोत, अभिजित भांबुरे, स्वप्नील सूर्यवंशी (तिघे रा. इस्लामपूर) आणि सत्यजित कदम (शिराळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चौघांविरोधात भा.दं.वि. कलम 452,323,504,506,34 आणि आर्म अ‍ॅक्ट Arm Act 4(25) अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

 

रविकिरण माने रात्री आपल्या कुटुंबासोबत घरी जेवण करत होते.
त्यावेळी सागर खोत आपल्या साथीदारांसह चाकू, गुप्ती, तलवार अशी हत्यारे घेऊन माने यांच्या घरात घुसला. तू सदाभाऊंवर टीका करतो का, तुला मस्ती आली आहे का, असे म्हणत माने यांच्यावर चल्ला चढवला. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय मध्ये पडल्याने हल्लेखोरांनी रविकिरण यांना ढकलून देत धक्काबुक्की करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली.
कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यानंतर चौघेजण मोटारीतून पळून गेले.
कासेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title : Sadabhau Khot | sagar khot son mla sadabhau khot has beaten youth islampur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | मोदी सरकारकडुन दिवाळी दरम्यान ‘या’ कर्मचाऱ्यांना मिऴु शकते मोठी भेट

Crime in Virar | भल्या पहाटे मंदिरात जाताना बड्या बिल्डरचा निर्घृण खून, शहरात प्रचंड खळबळ

Mutual Fund | म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक करता का? तात्काळ करा ‘हे’ काम अन्यथा काढू शकणार नाही तुमचे पैसे; जाणून घ्या