शेतकऱ्यांचा आक्रोश ! निर्यात बंदी कायमची हटवा सदाभाऊ खोत यांचा केंद्राला इशारा

लासलगाव – कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी आज औरंगाबाद-नाशिक राज्य मार्गावरील विंचूर येथील येथे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरवात केले. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे .

निर्यात बंदी हा सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे का ? सध्या शेतकऱ्यांचा हा संकटातला काळ असून त्यांच्या तोंडापशी आलेला घास हिरवू नका,बंदरावर, बांगलादेश सीमेवर मोठया प्रमाणात माल पोहचल्या नंतर अडकून ठेवलेला आहे हा माल निर्यात झाला नाही तर सडून जाईल त्यामुळे केंद्राने प्रथम हा माल निर्यात करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like