सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर घणाघात, म्हणाले…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा येथील जळगावमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यास रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत बोलत होते. सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यात यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांनी उभी केलेल्या सहकार चळवळीची मूहुर्तमेढ खाली पाडण्याचे काम हे शरद पवार यांनी केले आहे. अशा शब्दात शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणावरून शरद पवार यांच्या हस्ते होऊ नये, यावरून शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असतानाच. आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवार हे राजकारणाच्या पटलावरील बुद्धिमान आणि चांगला माणूस असून त्यांनी शतक मारावं पण शतक मारताना आमच्या लेकराबाळांना मारू नका’ असा टोलाही त्यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना लगावला आहे.

तसेच विकेल ते पिकेल या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची त्यांनी खिल्लीही उडवली आहे. तर राज्यात विजेचा आणि उसाच्या एकरकमी एफआरपीचा प्रश्न समोर आल्याने यंदाच्या अधिवेशनात राज्य सरकारला सभागृहात सळोकीपळो करून सोडणार आहोत. त्यासोबत शेतकऱ्यांच्या घरगुती आणि शेती पंपाची वीज कनेक्शन खंडीत करायला आलात तर हातात दांडकी घेऊन उभं राहणार असल्याचा असा इशारा सुद्धा सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला दिला आहे.