रिलीजच्या आधीच ‘सडक 2’ वादाच्या भोवऱ्यात, ‘आलिया-महेश भट’वर केस दाखल ! ‘या’ दिवशी सुनावणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणारा सडक 2 आगामी सिनेमा वादात सापडला आहे. रिलीजच्या आधीच सिनेमावर अनेक आरोप होत आहेत. दिग्गज फिल्ममेकर महेश भट आणि त्यांची मुलगी आलिया भट यांच्या विरोधात केस दाखल करण्यात आली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या आरोपखाली ही केस दखल करण्यात आली आहे.

कधी होणार सुनावणी ?

सीजेएम मुकेश कुमार यांच्या न्यायालयात कलम 295 A, 120 B अंतर्गत खटला दाखल झाला आहे. या प्रकरणी सुनावणी सीजेएम कोर्टात 8 जुलै रोजी होणार आहे.

मुकेश भट डायरेक्टेड सडक 2 सिनेमात पूजा भट, आलिया भट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त असे कलाकार काम करताना दिसणार आहेत.

काय आहे वाद ?

सिनेमात कैलास पर्वताचा फोटो सोशलवर व्हायरल करत फोटोवर सडक 2 लिहिलं आहे. यानंतर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आलीये आणि त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली आहे. वकिल प्रिय रंजन अणु यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like