सडक- २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबई : पोलीसनामा
महेश भट्ट यांची निर्मिती असलेला “सडक” हा चित्रपट  सुपरहिट ठरला  होता . आता या चित्रपटाचा सीक्वल “सडक-२”  नोव्हेंबर मध्ये येत आहे. हा चित्रपट   “नैराश्य ” या विषयावर प्रकाश टाकणार आहे . महेश भट्ट आणि विशेष फिल्म याची प्रस्तुती असणाऱ्या  सडक-२ चित्रपटाची निर्मिती  मुकेश भट्ट करत आहेत .

[amazon_link asins=’B07F1D267G,B00ZF89GJ8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca422a62-ab74-11e8-bf90-059caf269bc0′]

१९९१ साली  संजय दत्त व पूजा भट्ट यांची मुख्य भूमिका असणारा “सडक” चित्रपट जबरदस्त गाजला होता . आता याच जोडीला बरोबर घेऊन महेश भट्ट “सडक-२” बनवत आहेत .या चित्रपटामध्ये आणखी एका नवीन तरुण जोडीचा समावेश करण्यात येणार आहे . ज्यात  पूजा भट्टची बहीण आलियाची वर्णी लागल्याचे समजते.  “नैराश्य”  या विषयावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात संजय दत्तच्या वास्तविक जीवनातील  खऱ्या घटनांवर आधारित गोष्टी दाखवण्यात येणार आहेत .या चित्रपटाच्या  चित्रीकरणाची सुरुवात मार्च २०१९ सुरु झाली असून तो चित्रपट १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .

You might also like