पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का ! उपाध्यक्ष सदानंद शेट्टी भाजपमध्ये, कॅन्टोन्मेंट आणि कासब्यात ‘परिणाम’ होणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघामध्ये आज काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस चे प्रदेशपुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघामध्ये आज काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेस चे उपाध्यक्ष माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. शेट्टी यांच्या पत्नी सुजाता शेट्टी या विद्यमान नगरसेविका आहेत. शेट्टी यांच्या प्रवेशाने कॅन्टोन्मेंट मतदार संघामध्ये भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना फायदा होईल, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

भाजपचे शहर सरचिटणीस गणेश बिडकर यांच्या पुढाकाराने शेट्टी यांचा प्रवेश पार पडला. शेट्टी यांनी कॅन्टोन्मेंट मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने शर अध्यक्ष आणी माजी मंत्री रमेश बागवे याना उमेदवारी दिली . बंडखोरी करत अर्ज दाखल करणाऱ्या शेट्टी यांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतला होता. परंतु यानंतर ते पक्षात अस्वस्थ होते. आज अखेर त्यांनी बिडकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजप मध्ये प्रवेश केला.

मंगळवार पेठेतून गेली काही वर्षे महापालिकेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेट्टी यांनी एसआरए च्या माध्यमातून देखणा प्रकल्प उभा केला आहे. त्यामुळे झोपडपट्टी वासीयांचा त्यांना चांगला पाठिंबा आहे. एका पाठोपाठ एक पदाधिकारी पक्ष सोडत असल्याने काँग्रेस ची डोकेदुखी वाढली आहे. तर एक चांगला लोकप्रतिनिधी भाजप मध्ये आल्याने भाजपचे उमेदवार सुनिल कांबळे यांना फायदा होईल, असे गणेश बिडकर यांनी सांगितले.

visit : policenama.com