पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sadashiv Peth Pune Crime News | सोशल मीडियावर (Social Media) ओळख झालेल्या मित्राने नाशिक समाज कल्याण विभागात (Nashik Social Welfare Department) उपायुक्त असल्याचे सांगून एका महिलेकडून 15 तोळे सोन्याचे दागिने घेतले. दागिन्यांना पॉलिश करुन आणून देतो असे सांगून महिलेला खोटे दागिने देऊन एक लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 14 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता सदाशिव पेठेत घडला आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अशोक भोसले नावाच्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2), 316(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अशोक भोसले नावाच्या व्यक्तीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती त्यांनी मान्य केल्यानंतर त्यांना भोसले याने तो नाशिक येथे समाज कल्याण खात्याचा उपायुक्त असल्याचे सागितले. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर भोसले याने त्याच्याकडील 15 तोळे सोन्याचे दागिने महिलेकडे पुण्यातील सदाशिव पेठेत भेट घेऊन दिले. तसेच महिलेचे सोन्याचे दागिने दोन तासात पॉलिश करुन आणून देतो असे सांगून तिचे 1 लाख 20 हजार रुपयांचे दागिने घेऊन गेला. मात्र, दोन तास झाल्यानंतर देखील भोसले परत न आल्याने महिलेने त्याने दिलेले दागिने दुकानात जाऊन तपासले. त्यावेळी ते दागिने खोटे असल्याचे उघडकीस आले. आरोपीने बनावट सोन्याचे दागिने देऊन खरे सोन्याचे दागिने नेऊन फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा