‘या’ संस्थेत विद्यार्थ्याला ‘फी’ आणि शिक्षकाला ‘वेतन’ नाही, आजपर्यंत घडवले हजारो ‘किर्तनकार’, जाणून घ्या वैशिष्ट्ये

आळंदी (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन – आधुनिक काळात एक अलौकिक अध्यात्मिक शिक्षण देणारी वारकरी शिक्षण संस्था.. free of cost शिक्षण देणारी जगातील पहिली वारकरी शिक्षण संस्था..

भक्तीचा लळा लागे टाळी ब्रह्मानंदी ।
चारी धामाचे सुख देई वैष्णवा आळंदी ।

अशी ही पुण्यपावन आळंदी.. शके बाराशे म्हणजे बराशेच्या शतकात संपूर्ण विश्वाला वंदणीय असणारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ह्याच मातीच्या कुशीत अवताराला येवून कार्य करुन समाधिस्त झाली..
माऊलींचे जगावर फार उपकार आहे..

ज्यांनी सार्‍या जगाला आपलं म्हणावं,
हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । अापण जाहला ।।
हे विश्व माझे आहे व या विश्वातल्या घरातला प्रत्येक सदस्य माझा आहे…
केवढं मोठं ह्रदय म्हणता येईल माऊलींचे..

असो ह्याच पुण्यपावन अशा अलंकापुर नगरीमध्ये माऊलीच्या समाधीबरोबरच आधुनिक काळात प्रकर्षाने जाणवणारं एक सांप्रदायिक वैशिष्ट्य म्हणजे नुकतीच २०१७ साली शताब्दी पुर्ती झालेली स्वा.सु.सद्गुरु जोग म संस्थापित वारकरी शिक्षण संस्था.
हि संस्था गेली १०० वर्षे ज्ञानदानाचं व नैतिक शिक्षणाचं अखंडपणे कार्य करत आहे…
स्वा.सु.सद्गुरु जोग महाराजांनी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच (गुढीपाडवा ) नवीन वर्षाच्या पर्वावर सन १९१७ साली हि वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली.

जोग महाराज हे त्याकाळचे फार मोठे मल्लं होते आजही जोग महाराजांचा ईतिहास पश्चिम महाराष्ट्रात वर्णिला जातो. ते एक स्वातंत्र्यवीर होते.
लोकमान्य टिळक यांचे ते खास मित्र होतं
जोग महाराजांच्या घरण्यात वारकरी परंपरा होती.
जोग म यांना समाजाबद्दल फार तळमळ होती समाज त्या काळात ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाला वस्र लपेटून त्याची पूजा करत होता समाजाला भ्रम होता की ज्ञानेश्वरी आपली आई आहे तिचे वस्र कसे काढावे…..?
जोग म यांनी ज्ञानेश्वरीला गुढाळलेला कपडा बाजुला केला आणी सांगितले की ज्ञानेश्वरीला आपण आई मानतो मग आईचे दुध प्राशन करण्यासाठी कपडा हा बाजुला सारावाच लागणारं….
आणी अश्या प्रकारे लोकांमध्ये असणारी सांप्रदायिक गैरसमजुत बाजुला सारली.

समाजाची भोळी श्रद्धा बघून जोग म च्या मनामध्ये विचार आला…?की आपण या लोकांसाठी ज्ञानाने परिपुर्ण अशी पिढी तयार करायची की जी आपल्या आचार-विचाराने या समाजाला वाईट मार्गापासून व ते मानत असलेल्या भ्रामक जगताच्या गुंत्यातून सोडवण्यासाठी प्रगत करायचं. सांप्रदायाचा प्रचार करण्यासाठी प्रचारक तय्यार करायचे…!
आणी तेथून मग संस्थेचे काम सुरु झाले.
जोग म यांचे प्रथम चार शिष्य होते..

-पहिले प.पु.गु बंकटस्वामी महाराज
-दुसरे प.पु.गु मारोती बुवा गुरव
-तिसरे प.पु.गु लक्ष्मण बुवा इगतपुरीकर
-चौथे प.पु.गु मामासाहेब दांडेकर

ह्या चारही विभुतींनी नंतर संस्थेची धुरा संभाळली……
त्यातले मामासाहेब दांडेकर हे सर परशुरामभाऊ(SP) कॉलेज पुणे येथे प्राचार्य होते त्यांनी संस्थेचा अध्यक्षपदाचा कारभार बर्‍याच दिवस सांभाळला….
चार वर्षाचा आखीव रेखीव अभ्यासक्रम हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे….
त्यामध्ये
भगवद्गीता,विचारसागर(वेदांताचा ग्रंथ),ज्ञानेश्वरी,पंचदशी(वेदांताचा संस्कृत ग्रंथ)गाथा, ज्ञानेश्वरीतील निवडक अध्याय पाठांतराला व संस्थेची भजनी मालिका पाठांतराला असते.
अशाप्रकारे शास्र शुद्ध पद्धतीने अध्ययन व अध्यापन केले जाते.
समाजाचं बाह्यांग बदललं तरी त्याची नैतिकता आणी धार्मिक शिक्षणाचा पाया असणारं अंतरंग मात्र बदलू नये यासाठी ही संस्था प्रर्यत्नशील आहे….
कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय केवळ लोकाश्रयावर कार्यरत असणारी ही अलौकिक कार्य करणारी अशी संस्था आहे…..

आज समाजामध्ये पैशाशिवाय कोणतेही काम पुर्णत्वाला जात नाही पण याही अाधुनिक काळात निष्काम सेवेतून अविरतपणे कार्य करणारी संस्था जगातील एक आश्चर्य़च म्हणावे लागेल….
वेतानाशिवाय शिक्षक आणी फी शिवाय विद्यार्थी म्हणजे आधुनिक काळातली एक नाविण्यपुर्णताच म्हणावी लागेल…..
संस्थेमध्ये अनेक प्रांतातून विद्यार्थी शिक्षण घेतात कर्नाटक,गुजरात,राजस्थान व अन्य…..
संस्थेमध्ये अंध,अपंग विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेतात…..
वारकरी सांप्रदायाच्या विचार सरणीला अनुसरुन संस्था कार्य करते….
या संस्थेत जाती-पातीला थारा नाही कारण याती याती धर्म नाही विष्णूदासा ।
या न्यायाप्रमाणे हे कार्य चालू आहे….
सस्थेत caste ला महत्वचं नाही एकच जात ती म्हणजे ‘वारकरी’……
त्यामुळे संस्थेतील मुलं गुण्यागोविंदाने एका-मेकांप्रती आदरभाव मनी बाळगून असतात….
समाजात चाललेल्या जाती-जातीतील द्वेष भावना बघितल्या की संस्थेतील मुलांचे व गुरुवर्यांचे जीवन एक आदर्शच म्हणावे लागेल…..
संस्थेतील समस्त गुरुजन वर्ग हा ब्रह्मचर्य व्रताचं पालन व साधनामय आयुष्य जगणारा आहे….
एक-एका गुरुजनांचं जीवन बघितलं की त्यांच्यासारखचं आयुष्य प्रत्येक विद्यार्थ्याला जीवन घडणीला कारणीभुत ठरतं…..
हि स्ंस्था अनेक थोर सतपुरुषांच्या त्यागातून व निष्काम सेवेतून परिपुर्णतेला गेलेली आहे…..
या महाराष्ट्रात या संस्थेने अनेक मौल्यवान रत्न आपल्या आचार-विचाराने परिपुर्ण असे देवू केले…..
आजपर्यंत हजारो किर्तनकार,समाजप्रबोधनकार या संस्थेने घडवले आहे….
आज या संस्थेचा वेल खर्‍या अर्थाने बहरला आहे….
संस्थेमध्ये शिकत असलेले विद्यार्थी आपला चार वर्षाचा अभ्यास पुर्ण करुन अनेक क्षेत्रात कार्यरत होतात कुणी शिक्षण क्षेत्रात ,राजकिय,सामाजिक व न्यायव्यवस्था अश्या अनेक क्षेत्रात ते काम करतात,व ह्या वारकरी सांप्रदायाला विश्व सांप्रदाय बनवण्यासाठी कार्यरत आहे.
संस्थेचा उद्देश असा आहे की हे जे ज्ञान संस्था मुलांना देते ते ज्ञान विनाअपेक्षा लोकांपर्यंत पोहचवणे.
संस्थेत प्रवेश करण्यासाठी एक entrance परिक्षा द्यावी लागते. त्या परिक्षेत ५ ते १० पर्यंत शालेय अाभ्यासक्रमात शिकविले जाणारे व्याकरण हे शंभर गुणांसाठी असते.
त्यामध्ये विद्यार्थ्याला १०० पैकी साधरणता: ७५ % गुण मिळवणे आवश्यक आहे तरच संस्थेत प्रवेश मिळतो.
दरवर्षी संस्थेत ४०० विद्यार्थी entrance परिक्षेसाठी बसतात.
संस्थेचा अभ्यासक्रम:-
प्रथम वर्ष:-
संस्कृत भांडारकर भाग १ व २
पाठांतरासाठी अभंग व ओव्या
द्वितीय वर्ष:-
श्रीमद्भगवद्गीता व विचार सागर
पाठांतरासाठी अभंग व ओव्या
तृतीय वर्ष :-
पंचदशी व ज्ञानेश्वरी
पाठांतरासाठी ओव्या व अभंग
चतुर्थ वर्ष :-
ह्यावर्षात शेवटी किर्तनाची परिक्षा असते त्यासाठी मुलांना सहा अभंग दिले जातात.
त्यावर ४० मि चा कालावधी असतो त्याला किर्तन करतांनी गायन चाली व व्याख्यान हे विद्यार्थ्यालाच करावे लागते….
चतुर्थ वर्षात पंचदशी’ ज्ञानेश्वरी अभ्यासासाठी असते…..
पाठांतरासाठी संतपर प्रकारणातील अभंग असतात….
असा हा एकूण चार वर्षाचा अभ्यासक्रम संस्थेने ठरवलेला आहे.
संस्थेची दिनचर्या :-
संस्थेत दररोज नित्यनेमाने
सकाळी ५ वा काकडा
सकाळी ७ वा सामुहिक प्रार्थना व नंतर पाठ होतात…
संध्या ५ वा हरिपाठ.
संध्या ६.३० ते ८.०० वाजेपर्यंत भजन नंतर भोजन असते.
आजही संस्थेतील संपुर्ण विद्यार्थी दुपारच्या जेवनासाठी मधुकरी मागतात(भिक्षा)
तसेच संध्या जेवणाची व्यवस्था संस्थेने केली आहे.
आजही ३५० विद्यार्थी जेवणासाठी संस्थेत असतात….
विद्यार्थांना शिक्षण,निवास व भोजनाची व्यवस्था संस्था मोफत करते……
अशी अद्वितीय कार्य निष्काम सेवेतून करणारी संस्था खरचं निराळीच….
ह्या संस्थेसारखी free of cost चालणारी जगात दुसरी संस्था नसेल…….
स्वा.सु.सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेची ईमारत चाकण रोड आळंदी देवाची येथे भव्यदिव्यतेत उभी आहे…..
एकदा अवश्य या संस्थेस भेट द्यावी……

– हभप सागर महाराज भोंडे पाटील (विद्यार्थी, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची, पुणे, महाराष्ट्र)