साधू-संत राजकारणाच्या ‘आखाड्यात’

भोपाळ: वृत्तसंस्था

मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांनी एप्रिलमध्ये पाच बाबांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. त्यामुळे साधू-संतांच्या राजकीय महत्वकांक्षा वाढत आहे. आखाड्यात रमणारे बाबा वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी राजकीय ‘आखाड्यात’ उतरण्याच्या तयारीत आहेत. राजकारणाच्या आखाड्यात उतरुन हे साधू-संत आपले नशीब अजमावणार आहेत.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5f52181c-b432-11e8-963c-ab83a148891a’]

आपल्या अनुयायांमध्ये कॉम्प्युटर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी नामदेव त्यागी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे. मात्र मी भाजपावर तिकिटासाठी दबाव आणणार नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यास मी तयार आहे, अशा शब्दांमध्ये कॉम्प्युटर बाबांनी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. कॉम्प्युटर बाबांना इंदूरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं त्यांच्या एका अनुयायानं सांगितलं.

रामचरित मानसमध्ये पदवी घेतलेल्या ४७ वर्षांच्या बाबा अवधेशपुरी यांना उज्जैनमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. आपले विश्व हिंदू परिषद आणि संघाशी चांगले संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘भाजपा व्हेंटिलेटरवर असल्यापासून मी पक्षासाठी काम करत आहे. तिकिटासाठी मी भाजपावर दबाव आणणार नाही. मी निवडणूक लढवावी, अशी माझ्या अनुयायांची इच्छा आहे. भाजपानं तिकीट न दिल्यास मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन,’ असं बाबा अवधेशपुरी यांनी सांगितलं.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6548e31a-b432-11e8-a128-1d6cfcecc05c’]

संत मदन मोहन खडेश्वरी महाराज यांना सिवनी जिल्ह्यातील केवलारी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. ‘माझा विजय निश्चित आहे. भाजपानं तिकीट न दिल्यास मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवेन. गेल्या 30 वर्षांपासून मी केवलारीमध्ये काम करत आहे,’ असं खडेश्वरी महाराज यांनी म्हटलं. याशिवाय रायसेन जिल्ह्यातील रविनाथ महिवाले, बाबा महेंद्र प्रताप गिरी यांनाही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवायची आहे.

Please Subscribe Us On You Tube