चक्क दळण करताना दिसल्या मोदी सरकारच्या ‘या’ मंत्री !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीच्या हमीरपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री जमिनीवर बसून त्यांच्याच घरात दगडाच्या चक्कीत मसूरची डाळ दळताना दिसत आहेत. याआधीही त्यांचे स्वयंपाक करताना, भाकरी बनवताना आणि जेवण वाढतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

त्या नेहमीच अशा पद्धतीचे साधे जीवन जगताना दिसत असतात. या अगोदर देखील त्या बर्‍याच व्हिडिओंमध्ये दिसल्या आहेत. कधी त्या जेवण बनवताना दिसतात तर कधी डाळ बनवताना, कधी त्या भाकरी बनवताना दिसतात तर कधी जेवण वाढताना. आता त्यांचा डाळ दळतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

२०१२ मध्ये भाजपाच्या आमदार झाल्यानंतर २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने त्यांना फतेहपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. साध्वी निरंजन ज्योती यांनी केवळ ही निवडणुकच नाही जिंकली तर, मोदी सरकारमध्ये त्या केंद्रीय मंत्रीही झाल्या होत्या.

५ वर्षे मंत्री झाल्यानंतर २०१९ मध्ये त्या पुन्हा फतेहपूर जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्री असूनही त्या आपल्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. आताही साध्वी निरंजन ज्योती पुन्हा मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत, पण त्यांच्यावर व्हीव्हीआयपी संस्कृतीचा प्रभाव कुठेही दिसत नाही.