साध्वी प्राची यांच्याकडून IMA टीका अन् मदर तेरेसा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा, बाबा रामेदव यांनी कोट्यावधी लोकांना केलंय बरं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर योगगुरू रामदेव बाबा यांनी टीका केल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला. बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी अ‍ॅलोपॅथीनंतर पुन्हा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे रामदेव बाबा पुन्हा एकदा वादात सापडले. आता या वादामध्ये साध्वी प्राची यांचा प्रवेश झाला आहे. साध्वी प्राची यांनी आयएमएवर जोरदार टीका केली आणि मदर तेरेसा यांच्याबद्दल देखील वादग्रस्त विधान केलं आहे. “आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा, बाबा रामदेव Baba Ramdev यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलंय” असं म्हटलं आहे. साध्वी प्राची यांनी एका व्हिडीओतून आपली भूमिका मांडली आहे.

Video : ‘क्या हुआ तेरा वादा… जयवंतरावजी’; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ म्हणाल्या…

तसेच “बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे. आयएमएच्या लोकांनो लक्ष देऊन ऐका, वाटीभर पाण्यात बुडून मरा. लाज वाटू द्या. आयुर्वेदावर चिखलफेक करणाऱ्यांनो नीट ऐका, बाबा रामदेव देशासाठी खूप मोठं कार्य करत आहेत. ते कोट्यवधी लोकांना बरं करत आहेत” असं देखील त्यांनी म्हटलं आहे. “आयएमएच्या माध्यमातून १९२८ मध्ये एक एनजीओ तयार केली होती. भारतात मदर तेरेसा नावाची एक जादूगार होती, जी लोकांना स्पर्श करूनच बरं करायची. त्यांचा मृत्यूही रुग्णालयात झाला होता” असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे.

हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी

बाबा रामदेव Baba Ramdev यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. “स्वामी रामदेव यांना कुणाचा बापही अटक करू शकत नाही. रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी रामदेव बाबांवर टीकास्त्र सोडलं आहे. भारतात धर्मांतराचा खेळ सुरू असून, केंद्र सरकारने यावर कठोर कारवाई करावी. माठातील पाण्यामुळे कोणीही आजारी पडत नाही, फ्रीजमधील पाण्याने पडतं. हे आयुर्वेद सांगतं पण परदेशी कंपन्यांचे दलाल याचा विरोध करतात” असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्चचा sex education कार्यक्रम आता YouTube वर देखील उपलब्ध, संचालिका डॉ. राणी बंग करणार मार्गदर्शन

बाबा रामदेव यांच्यावर बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय जायसवाल यांनी जोरदार टीका केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून संजय यांनी बाबा रामदेव यांना “ते योगी नाहीत योगाचे कोका कोला आहेत” असं म्हटलं आहे. पश्चिम चंपारणमधून अनेकदा खासदार राहिलेल्या जायसवाल यांनी अ‍ॅलोपॅथीच्या मुद्द्यावरुन आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली आहे.

WhatsApp वर तीन रेड टिकचा काय आहे अर्थ? सरकार तुमच्यावर ठेवणार का लक्ष?, जाणून घ्या

त्यात संजय जायसवाल यांनी लिहिले आहे, की “योग अभ्यास आयुष्यात खूप गरजेचा आहे कारण तो तुम्हाला निरोगी ठेवतो. पण योग काही चिकित्सा पद्धत नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. हजारो वर्षांपासून आपल्याकडे उपचारांसाठी चरकसंहितेचा आणि सुश्रुतच्या शल्यक्रियेचा वापर करण्यात आला. हे कोण्या योगगुरुने केलेलं नाही. मागील काही दिवसांपासून एक विचित्र स्पर्धा सुरू असल्याचं मला दिसत आहे. प्रत्येक वायफळ गोष्टीवर उत्तर देण्याची काही गरज नसते. तुम्ही फार व्यक्त झाल्यास ज्या व्यक्तीला फार महत्व द्यायची गरज नसते त्याला महत्त्व देता. सध्या आयएमएसुद्धा हेच करत आहे. बाबा रामदेव एक चांगले योगगुरू आहेत मात्र ते योगी नाहीत. योग अभ्यासाबद्दलच्या त्यांच्या ज्ञानासंदर्भात कोणीच प्रश्न उपस्थित करू शकत नाही. मात्र आपल्या मेंदूसहीत सर्व अवयवांवर नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीला योगी म्हणतात.”

READ ALSO THIS

ACB Trap : लाच म्हणून घेतली ‘दारु-मटणा’ची पार्टी; ताव मारत असतानाच अधिकार्‍यांना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं, पुढं झालं असं काही…

Maratha Reservation : ‘…पण संभाजीराजेंना खरी भेट पंतप्रधान मोदींनी द्यायला हवी’

OBC Reservation : ठाकरे सरकारला मोठा झटका ! स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त OBC आरक्षण रद्द, SC नं याचिका फेटाळली