विधायक ! खा. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर खासदारकीचा पगार गरजू, गरीबांवर खर्च करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकारणात पाऊल ठेवताच विवादास्पद वक्यव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी खासदार म्हणून मिळणारा संपुर्ण पगार गरजू आणि गरीब लोकांवर खर्च करणार असल्याचे सांगितले. झाले असे की साध्वी प्रज्ञा ठाकूर या भोपाळमधील कमला नेहरु हॉस्पीटलची पाहणी करण्यासाठी पोहचल्या, जेथे त्यांनी हॉस्पीटलमध्ये गंभीर आजाराला लढा देणाऱ्या मुलीच्या उपचारासाठी मदत दिली. याच वेळी त्यांनी घोषणा केली की त्या आतापासून खासदार म्हणून मिळणारा पूर्ण पगार त्या गरीबांना आणि गरजूंना मदत म्हणून देणार आहे.

मी माझा पगार करणार गरजू, गरिबांवर खर्च –

त्या म्हणाल्या की, मी ठरवले आहे की मी माझा खासदार म्हणून मिळणारा संपुर्ण पगार मी मला न ठेवता गरजू आणि गरीबांवर खर्च करणार आहे. त्यामुळे मी माझ्या पगारातून हॉस्पीटलमध्ये आजारी असलेल्या मुलीच्या उपचारासाठी इंजेक्शन खरेदी करण्यासाठी देिले. त्या आजारी मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, त्याची मुलगी खूप काळापासून तापाने हैराण आहे, परंतू त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत की ते त्या मुलीच्या गंभीर आजारावर खर्च करु शकतील. कारण मुलीला जे इंजेक्शन देण्यात येते ते अत्यंत महाग आहे. त्यामुळे ते त्या मुलीवर उपचार करु शकत नव्हते.

मुलीला देण्यात येणाऱ्या एका इंजेक्शनचा खर्च 7000 हजार रुपये आहे. तर या किंमतीची 8 इंजेक्शन द्यावे लागतात.

हॉस्पीटलमधील गरजूची आणि उपचार घेणाऱ्या गरीबांची परिस्थिती पाहून साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपला पगार गरीबांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य विषयक वृत्त –  

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like