काय सांगता ! होय, ‘साध्वी मूर्ख’, दुर्देव आहे त्या आमच्या पक्षात आहेत’, भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गांधींचा मारेकरी हिंदूच, असे वक्तव्य उर्मिला मातोंडकर यांनी पुण्यात केले होते. पुण्यात सीएए विरोधातल्या सभेत उर्मिला मातोंडकर यांनी हे वक्तव्या केले होते. या वक्तव्यावरून एका वृत्तवाहिनीवर चर्चा आयोजित करण्यात आली होती. चर्चा सुरु असताना भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा उल्लेख आल्यावर भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांनी त्या साध्वी मूर्ख आहेत. दुर्दैव आहे त्या आमच्या पक्षात आहेत असे म्हटले.

सीएएला विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये गुरुवारी आयोजित कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर यांनी बोलताना सीएएची तुलना रॉलेट कायद्याशी केली होती. सीएएची तुलना रॉलेट अ‍ॅक्टशी करणे योग्य आहे का ? या विषयी चर्चा सुरु असताना साध्वींचा विषय निघाला होता. त्यावर भाजपच्या प्रवक्त्यांनी असा पवित्रा घेतला. ब्रिटीशकालीन भारतात रॉलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जायचा. सीएए सुद्धा काळा कायदा असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले होते.

उर्मीला मातोंडकर यांच्या वक्तव्यावर एका वृत्तवाहीनीवर चर्चा सुरु होती. यामध्ये भाजपचे खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मधू चव्हाण यांनी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी असे उद्गार काढले. चव्हाण म्हणाले, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. कोणत्याही गुन्हेगारांची जात, धर्म काढणं अयोग्य आहे. गोडसे खुनी होता. त्यांनी गांधीजींचा खून केला, हेच खरं आहे. तो हिंदू होता की मुस्लीम याचा विचार करणं गैर आहे. सीएए विरोधात खोटा प्रचार सुरु आहे. तो मुस्लीमविरोधी कायदा असल्याचे सांगितले जात आहे पण ते खरं नाही, असे चव्हाण म्हणाले.