साध्वी प्रज्ञासिंह यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भोपाळ मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेलया भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेलया वादग्रस्त विधानाचं वादळ संपते न संपते तोपर्यंतच आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह हे दहशतवादी आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात मला उभं राहावं लागलं, 16 वर्षांपूर्वी उमा भारती यांनी लढत दिली होती” असं वक्तव्य साध्वी यांनी केलं आहे. त्या भोपाळमध्ये एका सभेत बोलत होत्या.

हेमंत करकरेंचे जुने सहकारी निवृत्‍त एसीपी देशमुख साध्वींच्या विरोधात रिंगणात

साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. त्यानंतर सर्वस्तरातुन साध्वी यांच्यावर टीका झाली. साध्वी यांच्या वक्‍तव्यामुळे हेमंत करकरे यांचे अनेक सहकारी व्यथित झाले तर आयपीएस असोसिएशनने साध्वींच्या वक्‍तव्याचा तीव्र निषेध देखील केला. आता साध्वींनी केलेल्या वक्‍तव्यामुळे व्यथित झालेले करकरे यांचे माजी सहकारी निवृत्‍त एसीपी रियाझ देशमुख हे साध्वी यांच्या विरूध्द भोपाळ येथुन निवडणुक लढविणार आहेत. त्यांनी अपक्ष म्हणुन अर्ज देखील दाखल केला आहे.

भोपाळमध्ये भाजपकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर आणि काँग्रेसकडून दिग्विजय सिंग यांच्यामध्ये महामुकाबला होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासुन चालु होती. आता त्या महामुकाबल्यामध्ये रियाझ देशमुख यांनी उडी मारली आहे. सन 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी साध्वी यांना सन 2017 मध्ये जामिन मंजुर झाला होता. त्यांनी यापुर्वी 9 वर्षे तुरूंगात घालवलेली होती. लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अशाच साध्वींनी जे वक्‍तव्य केले त्यामुळे करकरेंचे अनेक सहकारी व्यथित झाले. आता देशमुख यांनी साध्वींचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे.

कोण आहेत निवृत्‍त एसीपी रियाझ देशमुख

सन 1986 मध्ये रियाझ देशमुख राज्य पोलिस दलात रूजु झाले. त्यांनी सुमारे 9 वर्षे अकोल्यात कर्तव्य बजाविले. सन 1988 मध्ये हेमंत करकरे हे अकोल्यात पोलिस अधीक्षक म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी देशमुख हे वाशिम पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी होते. सन 2016 मध्ये देशमुख हे अमरावती येथुन सहाय्यक पोलिस आयुक्‍त या पदावर असताना निवृत्‍त झाले. त्यानंतर ते पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांना कायदेशीर प्रकरणात सल्‍ला देण्याचे काम करतात. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात करकरे शहीद झाले. तो पर्यंत रियाझ देशमुख हे त्यांच्या संपर्कात होते.