बेताल वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे पंतप्रधानांकडून समर्थन 

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचे प्रतिक आहे. आणि ते काँग्रेसला महागात पडणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दशतवादाविरुद्ध कडक पाऊल उचलणाऱ्या मोदी सरकारने लोकसभेची उमेदवारी कशी दिली? असा प्रश्न विचारला. त्यावेळी एका महिलेला ते पण एका साध्वीला अशा पद्धतीने छळले आहे. आणि मी गुजरातमध्ये राहून आलेलो आहे. मी काँग्रेसला चांगल्यापैकी ओळखले आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट एका ठिकाणी बसून कागदावर लिहितात त्याच पद्धतीने आमच्या इथे जितके इनकाउंटर झाले. ते सुद्धा अशाच पद्धतीने झाले आहेत. प्रत्येक घटनेला आसच लांबवत होत आणि जुळवत होते.  असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचे प्रतिक आहे आणि ते काँग्रेसला महागात पडणार आहे, असेही त्यांनी म्हटले.  याचबरोबर, जस्टीक लोया यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा मृत्यू हा नसर्गिक नसून हत्या आहे असे सांगण्यात आले, असेही त्यांनी म्हटले.

Loading...
You might also like