दिग्विजय सिंह यांच्या विजयावर ‘साध्वी’ यांनी काढला ‘खोचक’ चिमटा, म्हणाल्या – ‘संन्यास घेण्याच्या वयात लोक काय काय करतात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या विजयाबद्दल मोठे विधान केले आहे. प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, ‘राजकारणात अशा व्यक्तीने संन्यास घ्यायला हवा पण असे लोक संन्यास देखील घेत नाहीत, संन्यासाच्या वयात काय काय करीत आहेत.’ साध्वी येथेच थांबल्या नाहीत त्यांनी चिमटा घेत म्हटले की दिग्विजय सिंह यांना कोणताही स्वाभिमान नाही. भोपाळमध्ये जनतेने पराभव केला. तरीही खासदार झाले. संन्यासाच्या वयात काय काय करीत आहेत दिग्विजय, काही लोक असे असतात ज्यांना स्वाभिमानच नसतो.

लोकसभा निवडणुकांचा संदर्भ देताना प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की भोपाळमधील लोकांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे. तरीही राज्यसभा निवडणुकीत उभे राहिले. याला राजकारण म्हणत नाही. जेथे कोणी त्यांचा आदर करीत नाही, तेथे कोणीही त्यांना विचारत नाही. म्हणून अशा व्यक्तीने संन्यास घ्यावा. परंतु असे लोक संन्यास देखील घेत नाहीत.

राजधानी भोपाळ लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी बंपर मताधिक्याने विजय मिळविला होता. प्रज्ञा ठाकूर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना 3,64,822 मतांच्या फरकाने पराभूत केले होते. लोकसभा निवडणुक 2019 मध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना एकूण 8,66,482 आणि दिग्विजय सिंग यांना 5,01,660 मते मिळाली. या जागेवर प्रज्ञा ठाकूर यांना 60% पेक्षा जास्त मते मिळाली होती.