Kolhapur News : पुर्वी कधी सफारी, कधी जीन्स तर कधी फॉर्मल; आता वर्दीवरच डयूटी असल्यानं रूबाब कमी अन् बंदोबस्त जादा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – डीबीचे पोलीस साध्या वेशात वावरत असल्याने ते कधीच ओळखू येत नाही. ते केव्हातरीच अंगावर वर्दी घालत असे. हेच ‘डिटेक्‍शन’पेक्षा त्यांचे ‘इंटरेस्ट’ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तसेच काही जण चक्क ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले. तथापि, काही दिवसांपूर्वी सर्वच डीबी बरखास्त केल्याने खाकी वर्दीवरच त्यांना ‘ड्युटी’ करावी लागत आहे. यामुळे पोलीस ठाण्यात सर्वजण वर्दीत दिसू लागले आहे.

परिसरातील चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या, अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याचे काम डीबी (गुन्हे शोध) पथकाचे आहे. या डीबी पथकात नाही, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत वर्णी लागण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावलेली असते. त्यामुळे या पथकात वर्षानुवर्षे तेच तेच चेहरे पाहायला मिळतात. दरम्यान, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सूत्रे हाती घेतल्यावर जिल्ह्यातील घरफोड्या, मोटारसायकल चोऱ्यांची गुन्ह्यांची उकल करणे, हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याचे निर्देश डीबी ला दिले होते.

मात्र, ‘डीबी’चे असमाधानकारक काम पाहून त्यांनी चार दिवसांपूर्वी ही पथके बरखास्त केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील एकमेक पथक याला अपवाद ठरले.

डीबी पथकाची परीक्षेद्वारे पुनर्रचना
पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पथके बरखास्त केल्यानंतर ‘डीबी’तील कर्मचारी आता वर्दीवर दिसत आहे. आता डिटेक्‍शन आणि जनरल ड्युटीसोबत बंदोबस्तात हे चेहरे दिसून येत आहे. डीबी पथकात काम करण्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे निर्देश बलकवडे यांनी दिले आहे. त्याच अनुषंगाने नव्या पथकात वर्णी लागते की नाही यांची धाकधूक अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.