Safe Investment Planning | ‘या’ स्कीममध्ये लावा केवळ 10,000 रुपये, मॅच्युरिटीनंतर होईल 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Safe Investment Planning | जर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणुकीच्या (Safe Investment Planning) शोधात असाल, म्हणजेच तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम नको असेल, तर पोस्ट ऑफिस (Post Office) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये (Post office scheme) तुम्हाला चांगली गुंतवणूक आणि रिटर्न (investment and return) देखील मिळतो.

 

पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम (Post Office Small Savings Scheme) अधिक चांगल्या आहेत. त्यात कमी खर्चात गुंतवणूक करून पैसे कमावता (Earn Money) येतात. अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आहे – पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit).

 

पोस्ट ऑफिस RD स्कीम म्हणजे काय?
एकूणच, या योजनेद्वारे, तुम्ही अगदी कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. याशिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतील. यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपये गुंतवू शकता. तुम्ही किती गुंतवणूक करू शकता याची कमाल मर्यादा नाही.

 

पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही चांगल्या व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्याची सरकारी हमी योजना आहे.

 

किती मिळेल व्याज?
पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले आरडी खाते 5 वर्षांसाठी असते. यापेक्षा कमी काळासाठी उघडता येत नाही. प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) जमा केलेल्या पैशावर व्याज मोजले जाते. मग ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी चक्रवाढ व्याजासह (compound interest) तुमच्या खात्यात जोडले जाते. (Safe Investment Planning)

 

इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, सध्या आरडी स्कीमवर 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार त्यांच्या सर्व लहान बचत योजनांमध्ये (Small Saving Schemes) दर तिमाहीला व्याजदर जाहीर करते.

10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवले, तेही 10 वर्षांसाठी, तर मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.

 

आरडी खात्याबद्दल काही खास गोष्टी

जर तुम्ही आरडीचा हप्ता वेळेवर जमा केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

हप्ता भरण्यास उशीर झाल्यास, तुम्हाला दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल.

सलग 4 हप्ते जमा न केल्यास तुमचे खाते बंद केले जाईल.

मात्र, खाते बंद केल्यावर, ते पुढील 2 महिन्यांसाठी पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.

 

Web Title :- Safe Investment Planning | post office scheme you can invest rs 10k and earn 16 lakh rupees money

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

10th-12th Exams Offline | सीबीएसई व अन्य शिक्षण मंडळाच्या 10 वी व 12 वी च्या परीक्षा ऑफलाईन; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 

Lesbian Romance | ‘या’ 5 वेबसिरिजमध्ये जोरदार झाला लेसबियन्सचा ‘रोमान्स’, प्रसिद्ध अभिनेत्र्यांनी केलं एकमेकांना KISS

 

Pune River Rejuvenation Project | मुळा- मुठा ‘नदी सुधार’ आणि ‘नदी काठ सुधार’ बाबत सत्ताधार्‍यांनाच संशय ! भाजप पदाधिकार्‍यांनीच ‘स्थायी समिती’ला दिलेल्या प्रस्तावामुळे चर्चेला उधाण

 

Blood Sugar And Cholesterol Level | डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉलची समस्या करू शकते ‘ही’ एक गोष्ट, डाएटमध्ये करा समावेश