Safe Online Transactions | मोबाईलवर घेत असाल Loan तर जाणून घ्या काय आहेत धोके आणि कसा करावा त्यापासून ‘बचाव’; DoT ने जारी दिला ‘सल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Safe Online Transactions | मोबाइल फोनवरून ऑनलाईन व्यवहारात वेगाने वाढ होत आहे. यासोबतच दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) सुरक्षित आणि सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी एक सल्ला (Advisory) जारी केला आहे. वाढत्या ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडण्याची जोखीम शेवटच्या यूजरसाठी चिंतेचे एक प्रमुख कारण बनले आहे. (Safe Online Transactions)

 

ही जोखीम टाळण्याचा उपाय म्हणून नागरिकांनी कुणाकडूनही सामायिक करण्यात आलेला कोणताही क्यूआर कोड (QR Code) स्कॅन न करण्यासाठी सांगून जागरूक करायचे आहे. मोबाईलवर मिनिटात लोन उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून सुद्धा मोठी फसवणूक करण्यात येत आहे.

 

अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, कारण बँक कधीही केवायसी अपडेट (KYC Update) करण्यासाठी लिंक पाठवत नाही. ओटीपी, सीव्हीव्ही, Pin सारखा गोपनीय डेटा बँक अधिकार्‍यांसह कुणासोबतही सामायिक करू नका. सल्लागाराने नागरिकांना आपल्या उपकरणांवर कोणतेही रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल न करण्याची सुद्धा विनंती केली आहे. (Safe Online Transactions)

अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, जेव्हा कधीही अ‍ॅडव्हान्स किंवा पैसे मागितले जातील
त्यावेळी सावधगिरी बाळगा आणि व्यक्ती किंवा कंपनीची पत तपासून पहा.
संभाव्य ऑनलाइन फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी केंद्राने लोकांना व्यक्तीगत माहिती,
जसे की, नंबर आणि संवेदनशील बँकिंग माहिती कुणासोबतही सामायिक न करण्यास सांगितले आहे.

 

केंद्राने लोकांना मोबाईल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महत्वपूर्ण आणि संवेदनशील माहिती
आणि पासवर्ड स्टोअर न करणे आणि आवश्यक असेल तर एखाद्या प्रकारच्या एन्क्रिप्शनचा (Safe Online Transactions) वापर करण्याची विनंती केली आहे.

 

हे सुद्धा सांगण्यात आले आहे की, पॉर्न, जुगार सारख्या संशयीत वेबसाइट्सवर जाऊ नका,
ज्या तुमचा फोन कमजोर बनवू शकतात. यामुळे जबरदस्तीने वसूली, आर्थिक नुकसान होऊ शकते.
अ‍ॅडव्हायजरीमध्ये लोकांना, अनोळखी वाय-फाय नेटवर्कचा वापर करणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.
तसेच सांगितले आहे की, अशा नेटवर्कचा वापर करून आर्थिक व्यवहार करू नये.

 

Web Title :- Safe Online Transactions | safe online transactions telecom ministry issues advisory to promote online transactions via mobile phones DoT Department of Telecommunications – DoT

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ST Workers Strike | तणावात असलेला लातूरच्या निलंगा डेपोतील एसटी कर्मचारी घरात कोसळला, उपचारादरम्यान झाला मृत्यू

Facebook India | छोटा व्यवसाय मोठा करण्यासाठी पैसा असो की तंत्रज्ञान Facebook देतंय प्रत्येक सुविधा, जाणून घ्या कोणाचा होणार फायदा

Pune Crime | बारामतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; एजंट महिला गजाआड