कीटकनाशक सुरक्षित वापर व कापूस पिकावरील बोंड अळी व्यवस्थापन  

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांना कीटकनाशक सुरक्षित वापर व कापूस पिकावरील बोंड अळी व्यवस्थापन याची जनजागृती करण्यासाठी जनजागृतीच्या रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांचे हस्ते करण्यात आले. सदर जनजागृती रथ कळंब तालुक्यात आठ जिल्हा परिषद मतदार संघात प्रचार करणार आहे .

उद्घाटन प्रसंगी तहसिलदार मंजुषा लटपटे, तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे, पंचायत समिती कृषी अधिकारी विरेश अंधारी, मंगेश चव्हाण, विस्तार अधिकारी (कृषी) मोहन बंडगर, श्रिनिवास शिंदे तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कृषी पंचायत समिती, कळंब, तालुका कृषी अधिकारी कळंब यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद उस्मानाबादचे कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमनशेटे यांनी मार्गदर्शन केले आहे .

सदर कार्यक्रम शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करताना सुरक्षा कीट वापरायची जनजागृती होणार आहे. तसेच विविध पिकाचे कीड व रोगाच्या नियंत्रणाची माहीती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –