Sagar Dhankar Murder Case | सागर घनकर हत्येप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारसह 18 जण दोषी, दिल्ली कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) ज्युनियर कुस्तीपटू सागर घनकर हत्येप्रकरणी (Junior Wrestler Sagar Dhankar Murder Case) ऑलिम्पियन सुशील कुमारसह (Olympian Sushil Kumar) 18 जणांविरुद्ध हत्या (Murder), हत्येचा प्रयत्न (Attempted Murder), दंगल (Riot) आणि गुन्हेगारी कट रचणे (Criminal Conspiracy) यांसह अन्य कलमांखाली आरोप निश्चित करत त्यांना दोषी ठरवले आहे. तसेच कोर्टानं दोन फरार आरोपींना (Sagar Dhankar Murder Case) देखील दोषी ठरवण्यात आले आहे.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal Stadium) 4 मे 2022 च्या मध्यरात्री कुस्तीपटूंच्या (Wrestlers) दोन गटांमध्ये हाणामारी झाली. ज्यात सागर धनकर (sagar Dhankar) नावाच्या कुस्तीपटूचा मृत्यू (Death) झाला. या प्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार याचे नाव तपासात समोर आले. यानंतर पोलिसांच्या हाती एक व्हिडिओ लागला ज्यामध्ये सुशील कुमार सागर धनकरला मारहाण (Sagar Dhankar Murder Case) करताना दिसत होता. यानंतर पोलिसांनी त्याला अटक (Arrest) केली.

 

 

हत्येच्या 20 दिवसानंतर सुशील कुमारला अटक

सागर घनकरच्या हत्येनंतर 20 दिवसानंतर सुशील कुमार आणि त्याचा सहकारी अजय यांना 20 दिवसानंतर अटक (arrest) करण्यात आली.

 

नोकरीतून निलंबित

सहकारी कुस्तीपटू सागर धनकरच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सुशील कुमारला रेल्वेच्या नोकरीतून निलंबित (Suspended from Railway Employment) करण्यात आले. सुशील कुमारवर हत्येचा आरोप असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्यानं त्याला नोकरीवर ठेवता येणार नसल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आले होते. सुशील कुमारला अनेक पदोन्नतीनंतर उत्तर रेल्वे येथे डेप्युटी चीफ कमर्शियल ऑफिसर (Deputy Chief Commercial Officer) म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

 

तुरुंगात टीव्हीची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी

सुशील कुमार तिहार जेलमध्ये (Tihar Jail) असून त्यानं प्रशासनाला आपल्या सेलमध्ये टीव्ही बसविण्याची मागणी केली होती.
त्याने आपल्या निवेदनात त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीत तो एकमेव कैदी असल्यानं त्याला एकटं वाटतंय.
त्यामुळं त्याला टीव्हीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी,
जेणेकरून कुस्ती खेळात काय चालले आहे याची माहिती त्याला मिळू शकेल.

 

Web Title :- Sagar Dhankar Murder Case | delhi court charges olympian sushil kumar
and 17 others in junior wrestler in sagar dhankar murder case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा