Sagar Rana Murder Case ! पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण; युक्रेनच्या ‘त्या’ महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसापूर्वी मित्रांच्या वादात 23 वर्षीय पैलवान सागर राणाची (Sagar Rana Murder Case) छत्रसाल स्टेडियममध्ये हत्या करण्यात आली. मात्र नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या हेत्येमधील मुख्य आरोपी असणारा ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) हा फरारी होता. त्याला दिल्ली पोलिसांनी नंतर अटक केली. मात्र, कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) आणि मृत पैलवान सागर राणा (Sagar Rana Murder Case) यांच्यात नेमका वाद कशामुळे झाला. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस आता युक्रेनच्या एका महिलेचा शोध घेत आहेत. यामुळे या प्रकरणाला एक नवा गूढ समोर आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमारच्या (Sushil Kumar) मॉडेल टाऊनमधील फ्लॅटमध्ये ही महिला राहत होती. सध्या ही महिला कुठे आहे याविषयी तक्रारदार अथवा संशयित यांना कोणालाही माहिती नाही. ही महिला मृत पैलवान सागर राणाचे मित्र अमित आणि सोनू महल यांच्या ओळखीची होती. आणि फरार गँगस्टर काला जठेडी याची ती महिला नातेवाईक होती. तसेच, सोनू महल याची पोलीस चौकशी करणार होते. परंतु तो हजर नव्हता. हत्येच्या त्या दिवशी सुशील कुमारने सोनू महल आणि अमित यांना मारहाण केली होती. तर सुशील कुमारसोबत ताब्यात घेतलेला अजय कुमार याला ती महिला आवडत होती. व अजयने महिलेबरोबर सेल्फी काढल्यानंतर दोन्ही गटात वादाला सुरुवात झाली.

सेल्फीवरुन दोन्ही गटात वाद निर्माण –

त्या महिलेचा सोनू महलने फ्लॅटवर वाढदिवस केला. त्यानंतर सुशीलचा निकटवर्तीय मित्र अजय याने तिच्यासोबत गैरवर्तन केले. नंतर त्यानं सेल्फी घेतली.
यावरून सोनूला राग आला. या कारणावरून त्यानं सागरसोबत मिळून आधी अजय कुमार आणि नंतर सुशीलसोबत शाब्दिक बाचाबाची झाली.
सेल्फी काढल्यामुळे आपला अपमान झाल्याचे म्हणत त्याने सुशील कुमारला अपमानाचा सूड घेण्यासाठी तयार केल्याची माहिती आहे.
तसेच, सुशील कुमारने तोपर्यंत गँगस्टर नीरज बवानासोबत हातमिळवणी केली. त्याने सोनू आणि सागरला आपला फ्लॅट रिकामी करण्यास सांगितलं.
या कारणाने काला जठेडी याचा संताप अनावर झाला, कारण त्याने सुशीलला तो फ्लॅट मिळवण्यात सहकार्य केले होते.
त्यात शेअर मिळावा अशी त्याची मागणी होती.

सागर राणाने छत्रसाल स्टेडिअममधून जवळपास साठ कुस्तीपटूंना दुसऱ्या आखाड्यात नेलं त्यावेळी वाद वाढला.
सुशीलने छत्रसालमधून बाहेर काढलेली विजेंदर नावाची व्यक्ती तिथे प्रशिक्षण देत होती.
सागर आणि विजेंदर यांनी मिळून नांगलोई येथे आखाडा सुरु केली होता,
यावरून सुशीलचा संताप अन्वर झाला. त्यानंतर सुशीलने सागरला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तसेच, अजय आणि युक्रेनच्या त्या महिलेच्या प्रकरणानंतर दोन्ही गटात वाद वाढला होता.
सुशील कुमारने यानंतर सागर, सोनी आणि अन्य तिघांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांना 4-5 मे च्या रात्री छत्रसाल स्टेडिअममध्ये आणून जबर मारहाण केली आणि त्यामध्ये पैलवान सागर राणाचा मृत्यू झाला आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Sagar Rana Murder Case | wrestler sagar dhankar murder sushil kumar delhi police ukraine woman

हे देखील वाचा

MLA’s appointed by Governor | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

Uddhav Thackeray and Sharad Pawar | ‘महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा ही मुख्यमंत्री, शरद पवारांची इच्छा’

woman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ