अभिनेत्री अन् खासदार नुसरत जहाँचं मंगळसूत्र ‘हराम’, हिंदू मुलीचा बुरखा ‘जायज’ !

लखनऊ : वृत्तसंस्था – भाजप नेत्या साध्वी प्राची यांनी देवबंदच्या मौलवीवर जोरदार टीका केली आहे. बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँच्या मंगळसूत्र घालण्यावर देण्यात आलेल्या फतव्यावर साध्वी प्राची यांनी टीका केली होती. नुसरत जहाँ यांनी हिंदू मुलाशी विवाह केला आहे.

साध्वी प्राची म्हणाल्या की, मुस्लिम मुलीने हिंदू मुलासोबत लग्न करून मंगळसूत्र घातले आणि टिकली लावली तर ते चुकीचे. जर लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलीसोबत लग्न करून तिला बुरख्यात ठेवले तर ते बरोबर. असे कस काय ? असा प्रश्न उपस्थित करत साध्वी प्राचीने एका कार्यक्रमात देवबंदच्या मौलवीवर टीका केली.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँने मंगळसूत्र घालून तसेच सिंदूर लावून संसदेत लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. शपथ घेतानाचे त्यांचे फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले होते. नुसरत जहाँ यांनी नुकतेच कोलकात्यातील बिजनेस मॅन निखिल जैन याच्यासोबत लग्न केले आहे.

नुसरत जहाँ जेव्हा शपथ घेण्यासाठी मंगळवारी लोकसभेत आली. तेव्हा ती पारंपरिक हिंदू पोशाखात पाहायला मिळाली. तिने गळ्यात मंगळसूत्र, माथ्यावर सिंदूर, हातात बांगड्या घातल्या होत्या. नुसरत जहाँ या धर्माने मुस्लिम आहेत. तिने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. देवबंदच्या मौलवींनी नुसरतच्या अशा राहण्यामुळे तिच्याविरुद्ध फतवा काढला आहे. त्या फतव्यावर साध्वी प्राची यांनी टीका केली आहे.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार