सह्याद्री प्रतिष्ठान देणार सिद्धगडला नवीन रूप

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – दुर्गसंवर्धन विभाग सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ‘घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा’ अंतर्गत सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड आयोजित दुर्ग संवर्धन मोहीम किल्ले सिद्धगड येथे दि. २० रोजी मोहिम आयोजित केली आहे. किल्यावर जाण्यासाठी मार्ग नारीवली गावातुन किल्ले सिध्दगडकडे सकाळी 8 वाजता निघणार आहे. दरम्यान या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या शिवभक्तांना गडावर जाण्यासाठी कोणती अडचण निर्माण होऊ नये व वेळेत योग्य मार्गाने जात यावे या करीत सह्याद्री प्रतिष्ठानचे शिवभक्त अजिंक्य हरड, नरेश विषे, महेश गोल्हे, प्रताप गोडांबे, राम भांडे, कल्पेश पवार, कल्पेश सोलसे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमे दरम्यान सिध्दगड किल्ल्यातील दरवाजा मधील माती काढुन परिसर स्वछ करणे, तटबंदीवरील झुडपे व गवत काढणे, किल्याच्या इतिहासाला उजाळा देण्यात येणार आहे

या मोहिमे अंतर्गत शिवभक्तांनी शक्य झाल्यास येता वेळी पहार, कोयते, घमेले, कुदळ, फावडे घेऊन येऊन निस्वार्थ सेवा करून गड किल्ल्यावर शोभा वाढवण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. सह्याद्री प्रतिष्ठान अंतर्गत अनेक गड किल्ल्यावर स्व:खर्चातून महादरवाजे बसवणे, तेथील सुशोभीकरण, डागडुजी, तोफा बसविणे असे अनेक उपक्रम राबवून किल्ल्याना एक नवीन रूप देण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. आपले कामकाज उरकून गड-किल्ले संवर्धनासाठी आपला अनमोल वेळ देण्याचे काम शिवभक्त करत आहेत. या शिवभक्तांच्या कार्याचे कौतुक अखंड महाराष्ट्र करत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी