सह्याद्री प्रतिष्ठानने बसविले किल्ले नारायणगडावर वास्तूदर्शक फलक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत अनेक ऐतिहासिक घडामोडींची साक्ष देणाऱ्या, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगड या किल्ल्यांवर दुर्ग संवर्धन मोहिम घेण्यात आली.

ह्या मोहिमेत किल्ल्याचे अस्तित्व व किल्ल्यावरील वास्तू दाखवणारे दिशा दर्शक, वास्तूदर्शक फलक लावण्यात आले.
[amazon_link asins=’B012AO1GKQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dceaacb6-8366-11e8-8ed7-c3ee16fc727b’]

प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था गेल्या १० वर्षांपासून दुर्गसंवर्धनाचे काम करत असून महाराष्ट्रातील निरनिराळ्या किल्ल्यांवर ७०० हुन अधिक मोहीमा सह्याद्री प्रतिष्ठानने राबविल्या आहेत अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रविण शिर्के यांनी दिली.

या मोहिमेत निलेश जेजुरकर, रतिलाल बाबेल,अनिल दिवेकर,संजय पवार, अमित भोर, रमेश भोसले,राजेश भोर,सिद्धेश कानडे, अमित कुलकर्णी,तेजस रोकडे,आदिनाथ बोऱ्हाडे, तुषार टेमकर, मयुर शिंदे, गौरव शेवाळे, अजित राक्षे, सचिन आंद्रे,पराग छल्लरे, स्वप्नाली वाळके, गणेश पुजारी, महेश तांबे आदी शिवभक्त सामील झाले होते.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb2ae623-8366-11e8-85a4-65245cbc40a0′]