काय सांगता…! चंद्रात चक्क साईबाबा दिसले ?

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

शिर्डीच्या साईबाबांची ख्याती आणि त्यांच्या भक्तांचा मेळा जगभर आहे. पण कालच्या  पौर्णिमेच्या रात्री चंद्रात चक्क साईबाबा दिसल्याची अफवा मुंबईभर पसरली होती. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणच्या मैदानांवर चंद्रदर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5a8c880e-c086-11e8-a9d4-57d879790d0f’]
सोशल मीडियाची कृपा आणि चंद्रात साईबाबा
सोमवारच्या भाद्रपद पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्राचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये चंद्रावर साईबाबांची प्रतिमा दिसत होती. खऱ्या भक्तांनाच फक्त आज रात्री चंद्रावर साईबाबांचा चेहरा दिसेल असा मॅसेजही व्हायरल झाला. त्यामुळे अनेक लोक साईबाबांचा चेहरा चंद्रावर दिसतो का हे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यामुळं रात्री अचानक मुंबईच्या काही रस्त्यांवर गर्दी पाहायला मिळाली. ही अफवा फक्त मुंबईतच नाही तर कोकणातही रत्नागिरी, रायगड परिसरात काही प्रमाणात पसरली.

जुलै महिन्याअखेर हीच अफवा उत्तर कर्नाटकात पसरली होती. तेव्हा चिकमंगलूर जिल्ह्यातील अनेक गावकऱ्यांनी चंद्र पाहण्यासाठी अशाच प्रकारे गर्दी केली होती. त्याआधी २०१४ मध्ये सुद्धा अशी अफवा देशातील काही भागांत पसरली होती.

गणेश विसर्जनावेळी मरण पावलेल्यांची संख्या वाढली, २६ जणांनी गमावले प्राण

[amazon_link asins=’B00KGZZ824,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22fd0499-c094-11e8-b166-a33eab94d4fb’]