साई भक्तांचे ब्रँडेड चप्पल चोरणारा अटकेत

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन

शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या महागड्या आणि ब्रँडेड चप्पल, बूट चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. भक्तांचे चप्पल, बूट चोरुन संस्थानच्या लॉकरमध्ये दडवून ठेवणा-या चोरट्याकडून तब्बल १ लाखाहून अधिक किंमतीचे ७५ ब्रँडेड चप्पल आणि बूट जप्त करण्यात आले आहेत.

[amazon_link asins=’B0785JJF7L,B07B6SN496,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2698b93-acf2-11e8-b60f-897fe5f3ec7b’]

गणेश वारूडकर (वय-४५ रा. धामणगाव, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या चप्पल चोराचे नाव आहे. या पंचेचाळीस वर्षीय भामट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी हा शिर्डी येथून ब्रँडेड चप्पल, बूट चोरून त्याची विक्री गावी करत होता.२१ ऑगस्ट पासून तो संस्थानच्या साई उद्यान भक्त निवासात लॉकर घेऊन राहात होता. आरतीच्या वेळी भाविक मंदिरात बराच वेळ जातात. ती संधी साधून तो ब्रॅन्डेड चप्पल, बूट चोरून लॉकरमध्ये नेऊन ठेवत असे. बुधवारी दुपारच्या आरतीच्यावेळी त्याने नेहमीप्रमाणे चप्पल, बूट चोरले. त्याचवेळी चप्पलाचा मालक असलेल्या दोन महिला आरतीतून बाहेर पडल्या. त्यांनी या चोरट्याला चप्पल चोरताना पाहिले. त्यांनी त्याचा पाठलाग केला. तो साई उद्यानमध्ये गेल्यावर महिलांनी सुरक्षारक्षकांना सांगितले. सुरक्षारक्षकांनी त्याला हटकताच तो पळून गेला.

पुणे / पिंपरी : उच्चभ्रू सोसायटीत गणपती मिटींगमध्ये एकाला बेदम मारहाण

संस्थानचे सुरक्षा प्रमुख पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तेथील रूम व लॉकरचे रेकॉर्ड तपासले असता या आरोपीच्या १४४ क्रमांकाच्या लॉकरमध्ये ६० चप्पल व १५ बूटाचे जोड आढळले. लॉकर घेताना आरोपीने आधार कार्ड व मोबाईल नंबर दिला होता. त्यानुसार मोबाईल लोकेशन व आधार कार्डवरील फोटोच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. रात्री आठ वाजता संस्थान प्रसादालयात तो आढळून आला. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पाकीटमारीबरोबरच भाविकांच्या चप्पल व बूट चोरीला जाण्याचे मोठे प्रमाण आहे. त्यात काही टोळ्याही सक्रिय असल्याची चर्चा आहे. यात लाखोंची उलाढाल होते. गेल्या पंधरा दिवसापूर्वी चेन्नईच्या एका महिला भाविकाचे बूट चोरीला गेल्याने तिने पोलिसात तक्रार दिली होती. तसेच संस्थानकडून सीसीटिव्ही फुटेजही मिळवले होत, मात्र याबाबत कोणीही गंभीरपणे घेतले नव्हते.