अभिनेत्री सई ताम्हणकरचा पाय ‘फॅक्चर’, राजस्थानमध्ये झाला अपघात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक फोटो समोर आला आहे ज्यात तिच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसत आहे. सईचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं समजत आहे. सई आपला आगामी सिनेमा मिमीच्या शुटींगसाठी राजस्थानला गेली होती. शुटींगवरून हॉटेलवर परत जाताना तिचा पाय मुरगळला आणि सूज आली. हॉस्पिटलला गेल्यानंतर तिला पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलं. सध्या सईचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

याबाबत बोलताना सई म्हणते, “जेव्हा मला कळालं की, माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे तेव्हा मला खूप भीती वाटली होती. मला सिनेमाच्या शुटींगची चिंता होती. कारण सिनेमाची शुटींग माझ्यामुळं थांबली तर संपूर्ण टीमवर याचा परिणाम होणार होता. परंतु माझ्या टीमनं मला सांभाळून घेतलं आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी अजूनही शुटींग सुरू ठेवलं आहे.”

मिमी सिनेमाबद्दल थोडक्यात…

सईचा आगामी सिनेमा मिमी बद्दल बोलायचं झालं तर मला आई व्हायचंय या मराठी सिनेमावर आधारीत सिनेमा आहे. या सिनेमाला काही प्रमाणात इमोशनल टच असणार आहे. खास बात अशी की, बॉलिवूड स्टार कृती सेनन या सिनेमात सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे. इतकेच नाही तर पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक यांच्याही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. लक्ष्मण उत्तेकर या सिनेमा डायरेक्शन करत आहे. 2020 हा स सिनेमा रिलीज केला जाणार आहे.