Sai Tamhankar | ‘वेड लावलंय’ गाण्यावर नाचता न आल्यामुळे सई ताम्हणकर झाली ट्रोल

0
638
Sai Tamhankar | sai tamhankar got trolled for not dancing properly on ved laglay song
file photo

पोलीसनामा ऑनलाईन : Sai Tamhankar | लोकप्रिय मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना आपलंस केलंय. ‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असूनही ‘वेड’ मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि फक्त तीन आठवड्यात या चित्रपटाने तब्बल 50 कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटाची कथा, चित्रपटातील गाणी हे सर्वच प्रेक्षकांना आवडलं आहे. अनेकांनी या चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्यावर थिरकतानाचे विडिओ शेअर केले आहेत. (Sai Tamhankar)

सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही तिने आपला ठसा उमटवला आहे. आता तिचा ‘वेड लागलंय’ या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. परंतु या गाण्यावर डान्स करणे तिला अजिबात जमलेलं नाही. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

‘वेड’ चित्रपटात जॉनटीची भूमिका साकारणारा अभिनेता शुभंकर सुनील तावडे याने त्याच्या इन्स्टाग्राम
अकाउंटवर त्याची सई ताम्हणकर सोबतची एक रील शेअर केली आहे.
या रीलला त्याने “माझ्या आवडत्या व्यक्तीपैकी एक आणि खरंच वेड लावलय “असं कॅप्शन दिल आहे या
व्हिडीओत तो सई ताम्हणकरला ‘वेड लावलंय’ या गाण्याच्या स्टेप्स शिकवताना दिसत आहे.
आधी शुभंकर एक स्टेप करतो आणि नंतर सई ती फॉलो करते.
त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये सईने त्याच्यासोबत डान्स केला म्हणून तिचे आभारही मानलेत.
पण या स्टेप्स फॉलो करत असताना सई अनेकदा चुकते.
त्यामुळे या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिच्यावर निशाणा साधला आहे.

 

या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “सई ताम्हणकर (Sai Tamhankar) एवढी मोठी अभिनेत्री असून देखील तिला जमलं नाही. माझी छोटीशी मुलगी छान करते.” तर दुसरा एकजण म्हणाला “स्टेप्स बघायला वेळ नाही मिळाला म्हणून तू शिकवतोय… पण काय फायदा, तिने ते चुकीचं केलंय.” तसेच अजून एकाने कमेंट करत म्हंटले कि “तुला डान्स आणि एक्टिंग येत नाही,” सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Web Title :- Sai Tamhankar | sai tamhankar got trolled for not dancing properly on ved laglay song

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक! एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीपात्रात, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना