Sai Tamhankar | “…तेव्हा व्यक्त होताना 10 हजार वेळा विचार करावा लागतो,” सई ताम्हणकरने व्यक्त केले मत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिने फक्त मराठीतच नाहीतर तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची एक अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2022 हे वर्ष सईसाठी (Sai Tamhankar) खूप खास होते. यावर्षी तिच्या कामासाठी तिला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले.

 

 

 

Advt.

 

सई (Sai Tamhankar) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या ग्लॅमर फोटोंमुळे बऱ्याचदा ती चर्चेत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नुकत्याच तिने दिलेल्या एका मुलाखतीत 2022 ने तिला काय शिकवलं हे सांगितलं आहे.

 

काय म्हणाली सई ताम्हणकर?

“मी एक अभिनेत्री आहे आणि त्यामुळे मला बरेच लोक फॉलो करत असतात. जेव्हा तुम्ही एखादी पब्लिक फिगर असता तेव्हा तुम्हाला व्यक्त होताना 10 हजार वेळा विचार करावा लागतो. हे मला 2022 ने शिकवलं. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवणं बंद करता तेव्हा बरंच काही घडतं, हेही मी मला 2022 मध्ये शिकायला मिळाले. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात मी हे आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार आहे ” असे सई ताम्हणकर म्हणाली आहे.

 

 

Web Title :- Sai Tamhankar | Sai tamhankar shared what did she learn from last year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा