Sai Tamhankar | सई ताम्हणकरला फिल्मफेअर पुरस्कारा दरम्यान अपमानास्पद वागणूक; नक्की काय आहे प्रकरण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – हिंदी चित्रपट सृष्टीत असो अथवा मराठी चित्रपट सृष्टीत ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून जिची ओळख आहे ती म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar). ‘मिमी’ (Mimi) या बॉलीवूड सिनेमानंतर सई आता लवकरच इम्रान हाश्मी (Imraan Hashmi) सोबत ‘ग्राउंड झिरो’ (Ground zero) या सिनेमात देखील झळकणार आहे. मिमी या चित्रपटासाठी फिल्मफेअर (Filmfare) पुरस्काराने सईला सन्मानित देखील करण्यात आले. त्याच संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सईने (Sai Tamhankar) आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओत आपण पाहू शकतो सई (Sai Tamhankar) ने एका मुलाखतीचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सईला रेड कार्पेट किंवा एखाद्या कार्यक्रमात मीडियाने तुला इग्नोर केलं का असे प्रश्न विचारले असता तिने होकारार्थी मान हलवत घडलेला प्रकार सांगितला.

“हो असं माझ्या यंदाच्याच आयफा अवॉर्ड (IIFA Award) सोहळ्या दरम्यान घडला आहे.
मला पाहताच काही मीडिया आणि इन्फ्लोअन्सरने त्यांचे कॅमेरे दुसरीकडे फिरवले. मला त्यांचे कोणाचेच नाव घ्यायचे नाही.
स्वाभाविकच मला त्यावेळी खूप वाईट वाटले. हो पण या अशा गोष्टीमुळे मला एका प्रकारचे बळ देखील मिळते.
परंतु एक दिवस असाही येईल की ते माझ्यासाठी थांबतील आणि मी तिथून निघून जाईन”. असे वक्त्यव्य सईने केले.

 

Web Title :- Sai Tamhankar | sai tamhankar talk about how she get ignore at red carpet at iifa award

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Kapoor | इतर अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धा कपूरने गाठला ‘हा’ सगळ्यात मोठा टप्पा

Leslie Phillips Passed Away | हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन

T20 World Cup | ‘या’ दोन टीममध्ये होणार टी20 वर्ल्ड कपची फायनल, ‘या’ दिग्गज खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी