Saibaba Sansthan Shirdi | शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Saibaba Sansthan Shirdi | प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या (Saibaba Sansthan Shirdi) घडामोडी काही थांबताना दिसत नाहीत. अन्य घडामोडींमुळे शिर्डी नेहमी चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. नुकतंच नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने काल (मंगळवारी) नूतन कार्यकारिणीचे अधिकार गोठविले. हे झाले असतानाच आता नव्या घडामोडींना वेग आला. काल रात्रीच संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह 6 जणांवर गुन्हे (FIR) दाखल करून अटक (Arrested) करण्यात आली. त्यामुळे या नव्या चर्चेला बळ आलं आहे.

साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप (Rajendra Jagtap), सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख विनोद कोते (Vinod Kote), कर्मचारी चेतक सावळे (Chetak Savale), सचिन गव्हाणे (Sachin Gawhane), सोसायटी कर्मचारी अजित जगताप (Ajit Jagtap) व राहुल फुंदे (Rahul Funde) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Saibaba Sansthan Shirdi मंदिरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडिया चॅनेलला पुरवून संस्थानाची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. याबाबत मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी (Harshvardhan Gawali) यांनी फिर्याद दिलीय.

जिल्हा न्यायाधीश आणि साईसंस्थांन तदर्थ समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या मंदिर भेटीचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन काल रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक कालातंराने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे (Sanjay Kale) यांनी लक्ष घालून याबबत न्यायालयात पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यात प्रशासकीय अधिकऱ्यांसह 6 जण दोषी आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा न्यायाधीश आणि सदस्य सहायक धर्मादाय आयुक्त यांनी 31 जुलै 2021 रोजी मंदिर परिसराला भेट दिली होती.
बैठक संपल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात उपाययोजनांची पाहणी केली.
पंरतु, त्यांच्या या पाहणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले.
कोरोनाच्या नियमांचा भंग करून या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात भेट दिली,
दर्शन घेतले असे सांगत हे व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाला होता.

Web Titel :- Saibaba Sansthan Shirdi | shirdi 6 arrested for defaming shirdi saibaba sansthan trust

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘ई-फेरफार’ योजनेत आता ‘प्रॉपर्टी कार्डचाही समावेश

Gold Price Today | खुशखबर ! 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन दुकानात वीज, पाण्याची बिले भरता येणार; PAN, पासपोर्टच्या अर्जाचीही सुविधा