‘सेक्रेड गेम्स 2′ पाहण्यासाठी झोप’मोड’ होणार, आज रात्री 12 पासून दुसरा सीझन ‘Live’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेटफ्लिक्सची मच अवेटेड सीरीज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनची प्रतिक्षा आता संपणार आहे. कॅलेंडरमध्ये १५ ऑगस्टची तारीख सुरु होईल आणि लगेचच नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स २ लाईव्ह होणार आहे. म्हणजेच रात्री १२ वाजताच नेटफ्लिक्सवर सर्व चाहते ही वेब सीरीज पाहू शकणार आहेत.

नेटफ्लिक्स इंडियाने स्वत: याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. ही पोस्ट टाकताना नेटफ्लिक्स इंडियाने म्हटले आहे की, लोकांना आपल्या झोपेचं बलिदान द्यावं लागेल. नेटफ्लिक्सने लिहिले आहे की, “आज रात्री १२ वाजल्यापासून सेक्रेड गेम्स लाईव्ह बघू शकता. म्हणजे झोपेचं बलिदान द्याव लागेल.”

सेक्रेड गेम्सचा पहिला एपिसोड लोकांनी खूपच डोक्यावर घेतला होता. समीक्षकांनीही या सीरीजचे खूप कौतुक केले होते. यातील डायलॉग्सही खूप प्रसिद्ध झाले होते. पहिला सीजन संपला नाही तोच चाहत्यांमध्ये दुसऱ्या सीजनची प्रतिक्षा सुरु झाली होती.

ही वेब सीरीज विक्रम चंद्रा यांची नॉव्हेल सेक्रेड गेम्सवर आधारीत आहे जी मुंबईतील अपराध जगातील कहानी आहे. ही कहानी विश्वासघात, अपराध आणि उत्कटता व्यक्त करते. दुसऱ्या सीजनची सुरुवात तिथूनच होणार आहे जिथे सरताज सिंहने (सैफ अली खान) शहराला वाचवण्यासाठी आपली लढाई सुरु ठेवली होती. तर गणेश गायतोंडेने (नवाजुद्दीन सिद्दीकी) मुंबईच्या दिग्गज डॉनच्या रुपात आपली स्थिती कायम ठेवली आणि अनेक आव्हानांचा सामना केला.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like